Home देशविदेश संविधान क्रांती महामोर्चा…

संविधान क्रांती महामोर्चा…

       उद्या दिनांक 10 नोहेंबर 2025 रोजी नांदेडच्या कलेक्टर ऑफिसवर जनतेचा मोर्चा धडकणार आहे. का आणि कशासाठी ? हे समजून घेतले पाहिजे,यासाठी हा आजचा लेख.

          या मोर्चाचे नाव आहे ” संविधान क्रांती महामोर्चा.” या नावाची पार्श्वभूमी किंवा उद्देश लक्षात घेतला पाहिजे.हा मोर्चा कुण्या राजकीय पक्षाचा नाही,कुण्या एका नेतृत्वाचा नाही,कुण्या एका जातीचा किंवा धर्माचा नाही.कोणती आर्थिक मागणी साठी हा मोर्चा नाही.या मोर्चाचे नेतृत्व हे सामूहिक आहे,एकट्याचे नाही.या मोर्चाचे नेतृत्व संविधान संरक्षण कृती समिती करीत आहे.या समितीत सर्व जातीचे,सर्व धर्माचे,सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांचे समविचारी लोक आहेत.पुरोगामी,परिवर्तनवादी,क्रांतिकारी विचाराचे कार्यकर्त्यांची ही कृती समिती आहे.

         सर्वसमावेशक, विद्याननिष्ठ,मानवतावादी,समतावादी,समाजवादी,लोकशाही,देश आणि देशातील नागरिकांचे सार्वभौमत्व,सेक्युलर अशा भारतीय संविधानावर निष्ठा असणाऱ्या राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा हा मोर्चा आहे.

           हा महा मोर्चा म्हणजे संविधानाने जनतेच्या संरक्षणासाठी आणि जनतेने संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला हा मोर्चा आहे.चारभिंतीतील हा मोर्चा नव्हे तर रस्त्यावर येऊन मोठमोठ्याने घोषणा देऊन प्रतिगाम्याना आव्हान देणारा हा मोर्चा आहे.क्रांतीची ही ठिणगी आहे.अशी ठिणगी की,याच ठिणगीने क्रांतीचा आगडोंब भडकणार आहे.आणि यामुळे बहुजनांच्या स्व अस्तित्वाचे,हक्काचे,अधिकाराचे रक्षण होणार आहे.बहुजनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे,हा धोका टाळण्यासाठी,रोखण्यासाठी हा क्रांती मोर्चा आहे.’ अभि नहीं तो कभी नहीं ” अशी वर्तमान परिस्थिती निर्माण झाली आहे,म्हणून हा मोर्चा आहे.

  शाहू फुले आंबेडकर कार्लमार्कस यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी हा मोर्चा आहे.

           15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्यदिनाची आठवण करून देणारा हा मोर्चा आहे,ज्या स्वातंत्र्याने आम्हाला स्वातंत्र्य दिले,धर्मनिरपेक्षतक्षांशी दिली,आम्हाला गुलामीतून मुक्ती दिली,ते भारतीय स्वातंत्र्य टिकविणारी राज्यघटना बाबासाहेबांनी आम्हाला तयार करून दिली,त्याच संविधानाची मोडतोड होत असेल,तर आमचे स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे.

     ” 15 ऑगस्ट 1947 हा आमचा स्वातंत्र्यदिन नव्हे,तर 2024 हा वर्ष आमचा स्वातंत्र्यदिन होय,कारण आम्हाला 2024 ला सत्ता मिळाली” अशा वल्गना काही प्रतिगामी,विषमतावादी लोकांनी केली.ही आम्हास माहीत आहे,एव्हढेच नाही तर प्रयागराज ( अलाहाबाद ) येथील त्रिवेणी संगमावर झालेल्या कुंभमेळाव्यात धर्मांधशक्तींनी भारताचे हिंदुराज्य घोषित केले आणि एक नवीन राज्यघटना पण जाहीर केली,आणि मनुस्मृति आणि चातुर्वर्ण्य मान्य असलेली मनुस्मृती ची प्रतिकृती असलेली भारताची नवीन राज्यघटना अमलात आणावी म्हणून या धर्मांध विषमतावादी प्रतिगामी शक्ती शासनावर दबाव आणणार आहेत.

           नव्हे,आधीच मनुवादी विचाराचे लोक सरकारमध्ये आहेत,त्यांचाच हा डाव आहे.अशा प्रकारे बाबासाहेबांच्या संविधानाला विचारला धोका निर्माण झाला आहे,ज्या संविधानाने हा देश चालतो,आणि ज्या संविधानाने अखिल जगाला सगळ्यात मोठी लोकशाही सिद्ध करून दाखविली त्याच संविधानाला आज धोका निर्माण झाला आहे,तो धोका टाळण्यासाठी हा मोर्चा आहे.संविधान म्हणजेच क्रांती होय.

           परंतु आपल्या देशात आड मार्गाने,छुप्या मार्गाने, चोर पावलांनी,अंधार वाटेने विषमतावादी,प्रतिगामी शोषक सत्तेत घुसले,संविधानाने आमजनतेला मतदानाचा अधिकार दिला,त्यामुळे आता बहुजन ( मागासवर्गीय ,गरीब ,) जनतेचे लोक सत्ता काबीज करतील या भीतीने शोषक विषमतावादी प्रतिगामी लोकप्रतिनिधींनी evm घोटाळा करून आणि गरिबांच्या आर्थिक मजबुरीचा फायदा घेऊन स्वातंत्र्यानंतरही सत्ता आपल्याच हाती ठेवली,म्हणून बाबासाहेबांनी संविधान देशाला प्रदान केल्यानंतर एक इशारा दिला होता की,” संविधान कितीही चांगले असले तरी ते राबविणारे जर वाईट असतील तर संविधानाचा काहीच उपयोग नाही,यासाठी मतदानाचा अधिकार तुम्हाला दिला,त्याद्वारे तुम्ही सत्तेत जा,आणि समाजवादी धोरणाचा,सेक्युलर धोरणाचा अंमल करून या देशातील गरिबी आणि अंधश्रद्धा दूर करा,विज्ञानवादी आणि मानवतावादी सरकार स्थापन करा.

         तरच लोकशाही जिवंत राहील,स्वातंत्र्य टिकेल ” हा इशारा देऊन बाबासाहेब गेले.ते गेले तरी त्यांचे विचार मेले नाहीत,त्यांचे विचार मारणे,आणि संविधान जाळून मनुस्मृती जाळल्या चा बदला घेणे हे परिगाम्यांचे धेय्य आहे,त्यास आजचे सरकार मदत करीत आहे.

           एकीकडे बाबासाहेबांचा संविधानाचा,तिरंगिझेंड्याचा उदो उदो करायचा आणि दुसरीकडे अनिल मिश्रा,किशोर तिवारी सारखे माणसे यांना मोकाट सोडायचे,त्यांना पकडायचे नाही,तसेच सत्तेत राहून लोकशाहीचे संरक्षण करणाऱ्या स्वायत्त संविधानिक संस्था उदा.निवडणूक आयोग,रिसर्वबँक, ईडी, सी आय डी,सुप्रीमकोर्ट,राष्ट्रपती,लोकसभा अध्यक्ष या ठिकाणी आर एस एस चे विषमतावादी प्रतिगामी विचाराचे लोक बसवायचे ,evm घोटाळा,मतदान याद्यांमध्ये घोळ करायचा,राज्य सरकारे पाडायची,आमदार खासदार विकत घ्यायचे असे अनेक दुष्ट प्रकार करून सत्ता सोडायची नाही,असा घाट या आर एस एस.प्रणित भाजपा सरकारने बांधला आहे.म्हणून आता सावध राहणे ही काळाची गरज आहे.

         जनतेला सावध करण्यासाठी,आणि आम्ही एकाच विचाराचे असूनही अनेक पक्षात असलो तरी कठीण प्रसंगी आम्ही आमच्या हक्कासाठी,अस्तित्वासाठी एक आहोत,नेक आहोत,संघटित आहोत,आणि संविधानाचे संरक्षक आहोत,प्रतिक्रांतीला क्रांती हेच आमचे उत्तर आहे.हे दाखविण्यासाठी म्हणून आजचा हा आमचा विराट मोर्चा आहे.

      लेखक : दत्ता तुमवाड.

       सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक: 9 नोव्हेंबर 2025. फोन: 94 20 91 22 09.