नेरी -शिरपूर रोडवर सुमो गाडीचा टायर फुटुन अपघात..  — सुदैवाने जिवीत हानी टळली..

   जय वाघे

ग्रामीण प्रतिनिधी चिमूर 

        नेरी : आज दुपारी 3 वाजताचे दरम्यान महिला व पुरुष सोयाबीन कापण्यासाठी सुमो गाडीने बाहेर गावला जात असताना अचानक सुमो या चारचाकी वाहनाचा समोरील टायर फुटल्याने गाडी शेतात पलटी झाली.

          शिरपूर व नेरी गावातील नागरिकांनी गाडी मधील मजूर लोकांना बाहेर काढून उप. जि.रुग्णालय चिमुर येथे उपचारासाठी नेले.सुदैवाने कोणत्याही मजूरांची जिवीत हानी झाली नाही.

                 घटनेचा पुढील तपास नेरी येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत.