सिंदेवाही पं. स. कार्यालयातील कर्मचारी कर्तव्यावर असताना चक्क झोपी गेले…. — गट विकास अधिकारी यांचा कर्मचाऱ्यावर वचक उरला नाही…

 

अमान कुरेशी 

जिल्हा प्रतिनिधि

सिंदेवाही :- पंचायत समिती कार्यालय सिंदेवाही येथील गट विकास अधिकारी यांचे दालनासमोर त्याच कार्यालयातील कर्मचारी चक्क टेबलवर झोपी गेले असून याकडे गट विकास अधिकारी अक्षय सुक्रे यांचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा कार्यालयातील कर्मचाऱ्यावर कोणताही वचक नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. याबाबत चौकशी करून झोपी जाणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाही करण्यात यावी . अशी मागणी करण्यात येत आहे.

              मागील अनेक दिवसापासून पंचायत समिती सिंदेवाही येथील गट विकास अधिकारी हे विविध कारणाने चर्चेत असून कार्यालयातील कर्मचारी यांचेवर त्यांचा कोणताही दबाव नसल्याने अनेकांच्या तक्रारी प्रलंबित आहेत. कोणत्याही तक्रारीची चौकशी सुक्रे यांचेकडून झालेली नाही. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गट विकास अधिकारी अक्षय सूक्रे यांची कानउघडणी करून ठेकेदारांच्या कामांना प्राधान्य देता, मात्र सामान्य नागरिकांचे प्रश्न रेंगाळत ठेवता, असे बोलून सुक्रे यांना चांगलेच धारेवर धरले होते. मात्र गट विकास अधिकारी यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे बोलण्याकडे दुर्लक्ष केले की काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. गट विकास अधिकारी यांचे दालनासमोर चक्क त्यांचेच कर्मचारी टेबलवर झोपा काढत आहेत. तर काही कर्मचारी दिवसभर कार्यालयाच्या बाहेर फिरत असतात. मात्र तरीही गट विकास अधिकारी यांचे कोणत्याही कर्मचाऱ्यांकडे लक्ष राहत नाही. कोणत्याही कार्यालयाचे प्रमुख हे चाणाक्ष असले तर त्या कार्यालयातील इतर कर्मचारी हे कामचुकारपणा करीत नाही. मात्र पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे इतर कर्मचाऱ्यावर कोणतेही वचक नसल्याने कोणी झोपी जाते, कोणी कार्यालयाबाहेरील पान टपरीवर बसून असतात. पंचायत समिती कार्यालय सिंदेवाही येथील गट विकास अधिकारी यांचे दालनासमोर झोपी गेलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी प्रसिद्धी माध्यमातून करण्यात येत आहे.