एकोडी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी अनिरुद्ध समरीत यांची निवड…

नागपूर विभागीय प्रतिनिधी: ऋग्वेद येवले

साकोली:आज एकोडी ग्रामपंचायत येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष पदाची निवड विशेष ग्रामसभा घेऊन करण्यात आली.त्यानिमित्त ग्रामसभेचे अध्यक्ष रिगन राऊत उपसरपंच हे होते. सर्व ग्रामपंचायत सदस्य वैभव खोब्रागडे,भावेश कोटांगले, सुकराम बंसोड,रहिलाताई कोचे, आशा बडवाईक, विभाताई तरोने, कुंदाताई जांभूळकर उपस्थित होते.

         तंटामुक्त अध्यक्ष पदाची निवड ही निवडणूक पद्धति ने घेण्यात आली. त्यामध्ये चार अर्जदार होते. विलास भुरे अनिरुद्ध समरित, सुकराम जांभूळकर , घनश्याम दृगकर यांचे नाव सुचविण्यात आले होते. त्यामध्ये अनिरुद्ध समरीत यांची तंटामुक्त अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

       निवडूनुक अधिकारी म्हणून ग्रामसेवक जी. एस. खंडाळे यांनी काम पाहिले तसेच उपसरपंच, सर्व सदस्य यांनी सहकार्य केले, पोलिस पाटील मेघाताई हूमे, लेंडे पोलीस इन्चार्ज एकोडी हे प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामपंचायत मधील कर्मचारी , समस्त ग्रामवासी ग्रामसभेला उपस्थित होते.सर्व ग्रामवासीयांनी तंटामुक्त अध्यक्षांच अनिरुद्ध समरीत यांचे अभिनंदन केले.