एक लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त.. — अवैध दारू सप्लायर च्या मुसक्या आवळल्या..

 

ऋषी सहारे

संपादक

अगामी गणेशोत्सवाच्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारू विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक ०८/०९/२०२३ रोजी पो.शि. ४०३२ सराटे पो.स्टे देसाईगंज यांना खात्रीशीर बातमीदाराकडून दुचाकी वाहनाने मौजा विसोरा येथील गांधी चौक रोडने अवैधरित्या देशी दारूची वाहतुक करणार आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस       उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार राऊत, कुमोटी, ढोके असे सापळा रचून इसम नामे अश्विन ऊर्फ गणेश संजय मटाले वय – २१ वर्षे रा. गांधीवार्ड, देसाईगंज ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली यास पकडले व त्याचे ताब्यातून १) अॅक्टीव्हा ग्रे रंगाची दुचाकी वाहन क्र. एम एच ३३ ए बी ७५६८ किं. ७००००/- रू. २) देशी दारु संत्री कंपनीच्या ९० मि.ली. मापाच्या प्लॅस्टीकच्या ४५० नग सिलबंद बॉटल किं.अं. ३६०००/- रु. ३). एक जुना वापरता रिअल मी कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल किं.अं. १०,००० /- रु असा एकुण ११६०००/- रु. किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पो.स्टे. देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या गुन्ह्यामध्ये अमन अलोने रा. गांधीवार्ड, देसाईगंज व निर्मलसिंग प्रेमसिंग मक्कड रा. गांधीवार्ड, देसाईगंज यांचा सहभाग असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.ना. २९७३ / राऊत हे करित आहेत.