संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा एकपात्री नाट्यप्रयोगाचा शुभारंभ..

 

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक 

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाचे दर्शन वारी मार्गावर नाटयरूपाने सर्वांना पाहता येणार असून सॄजनात्मक आनंद लुटण्याबरोबरच आरोग्य तपासणी ही अभिनव संकल्पनाही प्रथमच भक्तांना शासनाकडून मिळणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

        संवाद, पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा एकपात्री नाट्यप्रयोगाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

        प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी सादर केलेल्या ‘आनंदडोह’ या कार्यक्रमाचे देहूगाव येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आज आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ सदानंद मोरे होते. माजी आमदार बाळा भेगडे, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहू संस्थानचे पुरूषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, शिवाजी महाराज मोरे, राष्ट्रीय सेवा योजना समितीचे राजेश पांडे, अंजली ताई पाटील,संवादचे सुनील महाजन,संयोजक हरी चिकणे , निकिता मोघे आदी यावेळी उपस्थित होते.

         पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले,पालखी मार्गावर भारत सरकारने ११ हजार कोटी रुपयांची कामे केली असून हा सुंदर प्रवासाबरोबरच हा आनंद सोहळा आता नाटयरूपाने सर्वांना द्विगुणित करणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ सदानंद मोरे,बाळा भेगडे, राजेश पांडे यांचीही यावेळी भाषणे झाली.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी तर विकास कंद यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ कविता अय्यर यांनी सूत्रसंचालन तर मंदार चिकणे यांनी आभार मानले.