डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली,(जिमाका)दि.10: समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्याच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करणे करीता सुचित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते. दिनांक 15 मे 2023 रोजी सोमवार सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या दालनात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी असे प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज विहीत नमुन्यात दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे स्विकारण्यात येईल.
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली, बॅरेक क्र.1 खोली क्र.26 व 27, कलेक्टर कॉम्प्लेक्स ता.जि. गडचिरोली या कार्यालयात निशुल्क उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.