Home Social त्यागमुर्ती रमाई संपूर्ण वंचित समाजाची आई… — भारतीय बौद्ध महासभा महिला...

त्यागमुर्ती रमाई संपूर्ण वंचित समाजाची आई… — भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा आरमोरीचे अध्यक्ष सौ.भावनाताई बारसागडे यांचे प्रतिपादन….

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी – संघर्ष त्याग आणि माणुसकीचे जिवंत प्रतीक असलेल्या रमाईची देशातील वंचित अपेक्षित समाजावर अपार माया होती दुःखाचा डोंगर पेलत स्वतःचे आयुष्य कष्टात घालून खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिल्या स्वतःच्या कुटुंबापुरते न राहता संपूर्ण समाजाला कुटुंब मांडणाऱ्या ममतेचा आणि सहनशीलतेचा आदर्श उभा केला आणि म्हणून त्याच मूर्ती रमाई त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर संपूर्ण वंचित समाजाच्या आई आहेत असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा आरमोरी च्या अध्यक्ष भावनाताई बारसागडे यांनी त्याग मूर्ती रमाई जयंती निमित्ताने परिवर्तन भवन येथे आयोजित कार्यक्रमातून केला. 

          कार्यक्रमाच्या उद्घाटक स्थानी सुशीलाताई कोल्हटकर प्रमुख अतिथी म्हणून कुमताताई मेश्राम ,कल्पनाताई ठवरे, नर्मदाताई मेश्राम, ठवरे ताई, लताताई वासनिक आदी उपस्थित होत्या व सर्वांनी त्यागमूर्ती रमाई यांच्या यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. 

           कार्यक्रमाच्या संचालन भारती मेश्राम यांनी केले तर आभार अनुराधा रामटेके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.कुंदा झाडे, किरण बांबोडे ,यामीना मेश्राम, लताताई बारसागडे सुशिलाताई हुमणे,दुर्गाताई मेश्राम ,संध्याताई रामटेके, दीक्षा धोंगडे, वर्षा खोब्रागडे , सुलभा बोरकर पुष्पाताई रामटेके, आदींनी अथक परिश्रम घेतले.