Home Social निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गणेशवाडी ते सराटी रस्त्यावर पडले खड्डे….  — आवागमन...

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गणेशवाडी ते सराटी रस्त्यावर पडले खड्डे….  — आवागमन करतांना नागरिकांना करावी लागते कसरत…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

       बीके बी एन राज्यमार्ग लगत गणेशवाडी ते सराटी रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूकदारांना करावी लागते कसरत.

         रस्त्याच्या दैनंदिन वापरामुळे वाहनांची दुरवस्था, अडचणी आणि अपघातांची भीती वाढली आहे, मात्र कामाची गुणवत्ता व पारदर्शकता याबाबत प्रश्न उभे राहिले आहेत.

        स्थानिक रहिवासी आणि वाहतूकदारांनी सांगितले की, रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे व बुडबुडीचे आकाराचे गडद छिद्रे तयार झाले आहेत, ज्यामुळे दोन चाकी, चार चाकी वाहन चालवणाऱ्यांचा प्रवासत संध्याकाळच्या वेळेत अत्यंत धोकादायक झाला आहे.

          अनेक वाहनांचे चाके, ट्युबलेस टायर्स, सस्पेन्शन व गाडी पार्ट्स या खड्ड्यांमुळे वारंवार खराब होत आहेत आणि याचा खर्च सामान्य वाहन मालक नागरिकांना भरण्याची वेळ येत आहे.

          स्थानीय नागरिकांच्या तक्रारींबद्दल माहिती नसल्याचे वा नियोजित पद्धतीने काम होण्याऐवजी खड्डे फक्त थोड्याफार पॅचवर्कने भरले जात असल्याचे आरोप आहेत, ज्यामुळे ती भरलेली डांबर काहीच दिवस टिकत नाही. ही स्थिती अनेक ठिकाणी पूर्वीपेक्षा अधिक खराब दिसत असून, रस्त्याच्या पुनर्बांधणीऐवजी अर्धवट, निकृष्ट काम आहे.

           मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूकदारांना धोक्याला सामोरे जावे लागते आहे. तसेच कामाच्या निकृष्टतेवरून प्रशासकीय कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.

          स्थानीक नागरिकांचे मत आहे की, फक्त पॅचवर्क केल्याने रस्ता कायमस्वरुपी सुधारत नाही व दुर्घटनांचा धोका कायम राहतो. त्यामुळे जवळच्या इंदापूर बांधकाम विभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित पूर्ण रूंदीने रस्त्याची गुणवत्ता तपासणी, वाहतूकदारांचे म्हणणे आहे की, “या रस्त्यावरून दररोज प्रवास करताना संपूर्ण सावधगिरी बाळगावी लागते. रस्त्याचे निकृष्ट काम आता वाहनचालकांसाठी जबाबदारी समस्या बनली आहे.