Home Social भैय्याजी पाटील कापगते यांच्या जयंतीनिमित्त टिळक विद्यालय खंडाळा येथे आरोग्य तपासणी व...

भैय्याजी पाटील कापगते यांच्या जयंतीनिमित्त टिळक विद्यालय खंडाळा येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी साकोली द्वारा संचालित टिळक विद्यालय खंडाळा ता. साकोली येथे संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.भैय्याजी पाटील कापगते यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबीर व तज्ज्ञांच्या मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते.

        कार्यक्रमाच्या सुरुवातीला भैय्याजी पाटील कापगते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए.एन.निर्वाण सर होते.

       या शिबिरामध्ये डॉ. प्राजक्ता लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना ‘ताणतणाव मुक्त’ कसे राहावे, यावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच निरोगी आरोग्यासाठी आपला ‘आहार आणि विहार’ (जीवनशैली) कशी असावी, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.

        कार्यक्रमाचे औचित्य साधून डी. डी. तुमसरे सर यांनी स्व. भैय्याजी पाटील कापगते यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. तसेच, सध्याच्या काळात घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजावर शासनाने घातलेल्या बंदीबाबत माहिती देऊन, नायलॉन मांजा वापरू नये व त्याचे दुष्परिणाम टाळावेत, यावर त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

         या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक पी. एन. कापगते सर, ए. आर. कुंभरे सर, आर. एम. भेडारकर सर, एम. यु. मेश्राम मॅडम, सुनील मेंढे आणि विद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

        संस्थेच्या प्रगतीचे आधारस्तंभ असणाऱ्या माजी अध्यक्षांना त्यांच्या जयंतीदिनी आरोग्य सेवा आणि प्रबोधनाच्या माध्यमातून ही अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. या उपक्रमाचे परिसरातील पालकांनी व नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे.

       संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन ए. आर. कुंभरे यांनी तर आभार प्रदर्शन पि. एन. कापगते सर यांनी केले.

         कार्यक्रम यशस्वीतेकारिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.