अमन सभागृह येथे महिला व बालकल्याण विभाग तर्फे महीला मेळावा संपन्न.. — हजारो महिलांचा सहभाग. — ग्रामीण भागातील महिलांना जेंडर,आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शन..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्प पारशिवनी द्वारा आयोजित महिला मेळाव्याला हजारो महिलांनी हजेरी लावली.

          या मेळाव्यातंर्गत ग्रामीण भागातील महिलांना जेंडर,आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

         सदर महिला मेळावा कार्यक्रमाला आमदार जैस्वाल,माजी मंत्री.श्री.राजेंद्रजी मुळक,जि.प.अध्यक्ष व प.स. सभापती यांची उपस्थिती.

        ८ जानेवारी सोमवारला  पारशिवनी तालुक्यातील अमन सभागृह पारशिवनी येथे महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद,नागपुर अंतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्प पारशिवनी द्वारा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

       श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) तसेच सौ.मुक्ताताई कोकड्डे (अध्यक्ष जि.प.नागपूर) व आ.श्री.आशिषजी जयस्वाल (आमदार रामटेक विधानसभा) यांनी उपस्थिति दर्शावली व उपस्थित महिलांशी संवाद साधला.

         यावेळी कु.कुंदाताई राऊत(उपाध्यक्ष जि.प. नागपूर), सौ.रश्मीताई बर्वे ( सदस्य जि.प.नागपूर ) सौ.अवंतीकाताई लेकुरवाडे (सभापती महिला व बालकल्याण विकास विभाग जि.प.नागपूर), सौ.मंगलाताई निंबोणे (सभापती प.स. पारशिवनी), सौ.अर्चनाताई भोयर(जि.प सदस्या) सौ.निर्मलाताई उईके( जि.प.सदस्य), कु.करुणाताई भोवते( उपसभापती पारशिवनी), सौ. मीनाताई कावळे (माजी सभापती पारशिवनी), श्री.चेतनजी देशमुख (माजी उपसभापती पारशिवनी), श्री. संदीपजी भलावी(सदस्य प.सं पारशिवनी), सौ.प्रतिभाताई कुंभलकर (माजी नगराध्यक्षा नगरपंचायत पारशिवणी), सौ.कलावतीताई तडस (सरपंच निमखेडा ग्राम), श्री.बलवंतजी पडोळे (माजी सरपंच कान्द्री), श्री.दीपक शिवरकर( माजी नगरसेवक नगरपंचायत परशिवनी), श्री.डूमनजी चाकोले( शहराध्यक्ष पारशिवनी काँग्रेस कमिटी), श्री.इंद्रपालजी गोरले, श्री. दीपकजी भोयर, श्री.बंटी उमराव निंबोने, धर्मेन्द दुपारे ( अनुलोम).श्री. सुभाषजी जाधव(ग्राम विकास अधिकारी) वनिताकाळे(एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पारशिवनी) अश्विनी उईके (एकात्मिक बाल विकास प्रकल्प पारशिवनी)पारशिवनी सहेली महिला फार्मर प्रोडुसर कंपनी च्या अध्यक्ष सौ. हर्षा सतिश धांडे व सचिव सौ. वर्षा खंडाते व कोषाध्यक्ष सौ.माधुरी वासाडे व सर्व संचालक मंडळ शिल्पा चौधरी,वैशाली ठाकरे ,व प्रमोटर पुजा सूर्यवंशी व तारा बांगडे , कविता बिहुने,कल्पना शेंडे,लिला बोरकर इत्यादी मान्यवर मंडळी तथा मोठ्या संख्येने महिला व बचत गटाचे महीला सदस्य प्रामुख्यान उपस्थित होते.

***

— पत्रकारांना आमंत्रण नाही..

         पारशिवनी येथे महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्याचे स्थानिक पत्रकारांना आयोजकांनी आमंत्रित करण्याचे टाळले.

        कारण ४ डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत.

      त्यामुळे पारशिवनी तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे.याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

      या संबंधाने मुख्य मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो या शंकेमुळे झालेल्या महिला मेळाव्याचे आमंत्रण स्थानिक पत्रकारांना दिले नाही असे दिसून येते.