मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला प्रारंभ..

    राजेंद्र रामटेके

ग्रामीण तालुका प्रतिनिधी

            कुरखेडा 

           मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,खासदार अशोक नेते,आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे आदी मान्यवर उपस्थित होते.

      मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे,महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे.या अभियानातून शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील ३८ हजार ५०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येणारा मागास हा शब्द पुसून टाकला असून मुख्य प्रवाहाकडे गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे.आज सुरजागडच्या माध्यमातून १० हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

       महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून प्रत्येक बचत गट सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.महिलांना दिलेल्या कर्जाचे परतफेड करण्याचे प्रमाण १०० टक्के आहे.गतवर्षी राज्य शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटाला उपलब्ध करून दिले आहे.

    यावेळी १४९ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या ३० विकासकामांचे भूमीपूजन तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नवरत्न महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.