मोदींचा विकसित भारत राष्ट्र बनविण्याचा संकल्प:– खा. कविता पाटीदार – बेलवाडी येथे विकसित भारत संकल्प यात्रा.. 

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगामध्ये विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प केला आहे.मोदींच्या नेतृत्वामुळे जगामध्ये भारताची ताकद वाढली आहे.केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन खा.कविता पाटीदार (मध्य प्रदेश) यांनी सोमवारी केले.

          बेलवाडी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे सोमवारी सायंकाळी जोरदार स्वागत करण्यात आले.सदर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात खा.पाटीदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर उपस्थित होते.

         महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांचे वेगळे ऋणात्मक आहे.लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे महाराष्ट्राचे नाते आहे.त्यामुळे मध्यप्रदेश व महाराष्ट्राला आम्ही वेगळे मानत नाही असे खा.कविता पाटीदार यांनी भाषणात सांगितले.

         आगामी काळात सन 2047 पर्यंत भारताला जगामध्ये विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न मोदींनी बाळगले आहे.त्यानुसार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची यशस्वीपणे वाटचाल चालू असल्याचे गौरवोद्गार खा.पाटीदार यांनी काढले.

        त्यापुढे म्हणाल्या,केंद्र सरकारच्या अनेक योजना तळगाळातील जनतेपर्यंत पोचण्याचे काम विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये केले जात आहे.केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांची जनजागृती जनतेमध्ये या संकल्प रथयात्राद्वारे होत आहे.महिला वर्गाची स्वयंपाकाचे अडचण लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी उज्वला गॅस योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू केली आहे.आयुष्यमान भारत योजना, किसान सन्मान योजना आदी अनेक योजनांचा लाभ जनतेने घ्यावा नागरिकांनी घ्यावा.

          महाराष्ट्र 1 रुपयात कृषी विमा योजना,नमो शेतकरी सन्मान योजना,महात्मा फुले जन आरोग्य योजना आदि योजना राबवत असल्याबद्दल राज्यातील महायुती सरकारला खा. कविता पाटीदार यांनी धन्यवाद दिले.

     यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकारने समाजातील सर्व घटकांसाठीच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. इंदापूर तालुक्यात या सर्व योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी प्रभावीपणे काम केले जात आहे. 

      आज अखेर तालुक्यात 92 गावात आपली ही संकल्प विकास यात्रा पोहचली आहे. इंदापूर तालुक्यात दूधगंगा दूध संघाचे संकलन सव्वा लाख लिटर पर्यंत पोहोचले आहे.

        इंदापूर तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून जनतेच्या विकासाचे मोठी काम उभे करण्यात आले आहे,असे गौरवोद्गारही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी काढले.

         प्रास्ताविक भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी केले.यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील,गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

         या कार्यक्रमास साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक,रंजनकाका तावरे,भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे,वसंत मोहोळकर,तानाजी थोरात,सत्यशील पाटील, संग्रामसिंह निंबाळकर,पै.नितीन माने,अँड.हेमंत नरुटे,विजय पवार आदींसह गावोगावचे सरपंच, पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते. 

        यावेळी लाभार्थ्यांना विविध योजनांच्या प्रमाणपत्राचे वितरण खा.कविता पाटीदार,हर्षवर्धन पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आभार सरपंच मयुरी जामदार यांनी मानले.

**

 चौकट 

 

 हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक!

       भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी जे विकासाचे काम केले आहे,ते कौतुकास्पद आहे.

       तसेच हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याबद्दल खा.कविता पाटीदार यांनी भाषणामध्ये गौरवोद्गार काढले.

           याचबरोबर खा.कविता पाटीदार यांनी वाजपेयींची कविता सादर करून त्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुकही केले.