कुमार कार्तिक इंगळेने राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक…

     रोहन आदेवार

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

वर्धा/ यवतमाळ

          वर्धा: विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या संगमनेर शाखेच्या वतीने नुकत्याच शहरातील श्रमिक मंगल कार्यालयात राज्यस्तरीय विद्रोही काव्य स्पर्धा- २०२४ उत्साहात पार पडल्या.

          स्पर्धेचे उद्घाटन राज्यातील विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांचे हस्ते परिवर्तनाचे अशोक चक्र फिरवून झाले.प्रसंगी भारतीय संविधानाची उद्देशिका गाण्यात आली. संविधान उद्देशिकेस सर्व उपस्थितांनी मानवंदना दिली.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी अरुण घोडेराव होते.यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महासचिव डॉ. जालिंदर घिगे, रानकवी तुकाराम धांडे ,स्वागताध्यक्ष प्रविण गवांदे , सुरेश वाकचौरे, डॉ. राहूल हांडे, कार्याध्यक्ष अरविंद गाडेकर, अध्यक्ष चंद्रकांत पवार,सचिव श्रीकांत माघाडे, भास्कर बुलाखे, राजेश माघाडे,मनिषा पटेकर, ईशान संगमनेरकर इ. मान्यवर मंचावर उपस्थित होते.                

        या विद्रोही काव्य स्पर्धेसाठी एकूण ७४ स्पर्धक सहभागी झाले होते. काव्य स्पर्धा संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला 

        प्रथम क्रमांक *कुमार कार्तिक इंगळे, अमरावती यांच्या- “मार्ग संपले नाही माझ्या ध्येयाचे” या कवितेने पटकावला. त्यास माघाडे परिवारातर्फे सर्जेराव माघाडे यांचे स्मरणार्थ , स्मृती चिन्ह व रु. ५००० रोख रक्कम या स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले. 

        द्वितीय क्रमांक ऋषिकेश सोळसे, तळेगाव, संगमनेर यांच्या ” जातीयतेचे येथे लेवून अत्तर” या कवितेस प्राप्त झाला. त्यांस समता परिषद , अहमदनगर यांचे वतीने स्मृती चिन्ह व रु. ३५०० रोख रक्कम या स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले . 

       तृतीय क्रमांक रंगराज ढेंगळे, नाशिक यांच्या ” घोडे ” या कवितेस प्राप्त झाला. त्यांस विश्वनाथ घोसाळे यांचे स्मरणार्थ स्मृती चिन्ह व रु. ३००० रोख रक्कम या स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.  

          चतुर्थ क्रमांक खळींद्रकुमार लोखंडे, सातारा यांच्या ” खरा महाराष्ट्र ” या कवितेस प्राप्त झाला. त्यास भिमाबाई सूर्यवंशी यांचे स्मरणार्थ स्मृती चिन्ह व रु. २५०० रोख रक्कम या स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.