वरोरा येथे ‘अनैशा’ वाहन चालक कामगार संघटनेची सभा संपन्न….

प्रितम जनबंधु

     संपादक 

         भारत सरकारने नुकत्याच पारित केलेल्या हिट अँड रन या कायद्याच्या तरतुदीत अचानक झालेल्या अपघातात वाहन चालकांना जबाबदार धरून दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड तरतूद करण्यात आल्यामुळे हिट अँड रन कायद्यांची वाहनचालक कामगारात फार मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. वाहन चालक कामगार हवालदिल झाले आहेत. या वाहन चालक कामगारांच्या मनात दिलासा निर्माण करण्यासाठी आम्ही आपल्या समोर आज हजर झालो आहोत तमाम वाहन चालकांनी एकजुटीने सामना केल्यास हिट अँड रन हा कायदा वापस घेण्यासाठी भाग पाडू,असे परखड मत अनैशा वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी अलिशान सेलिब्रेशन, एकार्जुना चौक, इथे रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ ला झालेल्या वाहन चालक कामगार संघटनेच्या सभेत व्यक्त करण्यात आले.

           तसेच लवकरच हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ ट्रान्सपोर्टनगर अम्बुजा फाटा येथून स्टेरिंग छोडो आंदोलन करण्यात येणार असून सर्व वाहन चालक कामगार बांधवांनी आपण चालवित असलेल्या वाहनांच्या चाब्या वाहन मालकाला सोपवून स्थळ ट्रान्सपोर्टनगर, अम्बुजा फाटा, हरदोना त. राजुरा जि. चंद्रपूर येथे जोपर्यंत सरकार हिट अँड रन कायदा वापस घेण्यात येत नाही तोपर्यंत येथे सुरू होत असलेल्या क्रमशः धरणे आंदोलन, साखळी उपषोण आणि अन्नत्याग आंदोलनात तन मन धनाने सहभागी सहभागी व्हायचे आहे.

              रस्त्याने जाणाऱ्या कुत्र्याला आपण दगड फेकून मारल्यास किंवा तशी क्रिया केली तरी कुत्रा एकटा असल्याने पळून जातो पण तसाच दगड मधमाशांच्या मोहाळावर फेकून मारल्यास मधमाशा आपल्या संघटनशक्तीने तुम्हाला पळता भुई थोडी करेल म्हणून हिट अँड रन कायद्याच्या विरोधात एकजुटीने मधमाशासारखे मोहोळ उठवून वाहन चालकांच्या हिताच्या विरोधात येणाऱ्यांना एकजुटीने योग्य निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी दोन चाकी, तीन चाकी,चार चाकी, जड वाहन चालक इत्यादी सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी एकसंघ संघटनशक्ती निर्माण करून संघटितपणे संघर्ष करून वाहन चालकांच्या हिताच्या विरोधात येणारा काळा कायदा वापस घेण्यासाठी भाग पाडू या. असे प्रतिपादन रिपब्लिक प्रचारक आणि अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य सल्लागार अशोककुमार उमरे गडचांदूर यांनी केले.

                     सभेत जिल्हा संघटक अनंताभाऊ रामटेके, कमलेश राऊत, संतोष वाघमारे, सत्यपाल गौरकार ज्ञानेश्वर गोखरे इत्यादींनी समयोचित मार्गदर्शन केले.

                सदर सभेत उपस्थित वाहनचालकांच्या आग्रहास्तव अनैशा वाहन चालक कामगार संघटनेची वरोरा शहर शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.   

               तालुका संपर्क प्रमुख- रवि रुपसिंग देशवाल, तालुका संपर्क उपप्रमुख- सुरज प्रभाकर टोंगे,अध्यक्ष- संदीप बाळाजी कुबडे, उपाध्यक्ष- पंडित दशरथ आत्राम, कोषाध्यक्ष- मंगलदीप श्रीहरी डोंगरे, शहर सचिव- प्रशांत मारोती कोल्हे, शहर सरचिटणीस- मिथुन यशवंत मडावी, सचिव- कैलास महादेव ढवळे, कार्य. सदस्य- अफसर खान रहमत खान सर्व पदाधिकाऱ्यांना अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे नियुक्ती पत्र देऊन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

                  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप कुबडे वरोरा, मंगलदीप डोंगरे डोंगरगांव, पंडित आत्राम, मिथुन मडावी, विजय तोडासे, सुरेश मडावी, सुविल शेंद्रे, अमोल बतखल, देविदास येरखाडे, लालीराम निषाद, सुनील चांभारे, राजू मेश्राम, नाना नेहारे, प्रशांत कोल्हे, आशिष नन्नावरे, बालाजी पिंपळशेंडे, दिपक जगनाडे, निखिल सायरकर, राजू आवारी, सचिन मडावी, राजू बेलखुडे, रवि डाखरे, प्रविण मेश्राम, प्रशांत मिलमिले, प्रदिप बतखल, राजू ललनसिंग, विजय भारती, गगनभाऊ उईके, हनुमान ढेंगळे, प्रेम बोटरे, रवि जैस्वाल, सुरज टोंगे, राजकुमार मोहुर्ले इत्यादी वाहन चालक सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.