सर्वसामान्य भारतीय नागरिकांना विनम्र आवाहन.. — कायदेशीर व वैज्ञानिक दृष्ट्या अनभिज्ञ असलेल्या जनतेला सुचना मागण्याचे महाभयानक षडयंत्र.. — अर्थात ईव्हीएम व व्हीव्हिपॅट संबंधात जनतेकडून सुचना मागण्याचे कटकारस्थान… (जनहितार्थ प्रकाशित.)

       “गेल्या अनेक दिवसापासून सदरील केंद्रसरकारची ( मुख्य निवडणूक आयोगाची ) सार्वजनिक सूचना मराठी, शहिंदी आणि इंग्रजी भाषेत व्हायरल होत आहे……

        तीचा अर्थ दोन बाजूचा आहे.एक देशात लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळी निवडणुका घेण्याचा आहे तर दुसरा,लोकसभा विधानसभा केवळ एकदाच घ्यायच्या,नंतर कधीच नाही.( वरील सूचनेमध्ये काय आहे की, ” देशात कायमस्वरूपी एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी सूचना मागवण्यात येत आहेत आणि ईव्हीएम /व्हिव्हीपीएटीu सारख्या लॉजिस्टिकची व्यवस्था करणे यासाठी सूचना मागवल्या.)..

**

असाही त्याचा अर्थ निघतो…..!

          त्याचप्रमाणे,EVM + VVPAT मध्ये पारदर्शकता आणण्यासाठीच्या सूचना त्यामध्ये आहेत.

         याचा अर्थ स्पष्ट आहे की, जनतेकडून या सूचना एका बाजूच्या अर्थाने मागवायच्या आणि त्याचा दुसरा अर्थ घेऊन आमच्याकडे या सूचना आल्या असे गृहीत धरून त्यांची संख्या ( खोटी संख्या ) सांगायची आणि त्या आधारावर जनतेनीच मागणी केली होती म्हणून आम्ही 2024 च्या सर्व ( लोकसभा व उर्वरित सर्व विधानसभा निवडणुका ) निवडणुका EVM + VVPAT आधारे घेऊन लोकशाहीच्या नावावर लोकशाहीची हत्या करायची असाही मनसू्बा RSS आणि मोदी-शहाचा असू शकतो. ( आता सध्या मोदी,शहा म्हणजे सर्व देश आणि कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ,सर्वोच्च न्यायालय आणि गोदी मीडिया,कॅग,निवडणूक आयोग, सी.बी.आय.सर्वकाही आहेत.)

         म्हणून सर्वांना एकच विनंती की, येत्या 15 जानेवारी पर्यंत प्रत्येकानी संबंधित वेबसाईटवर जाऊन केवळ एकच मेसेज टाईप करून मेल करायचा की,……

     ” WE HATE TO THE EVM +VVPAT VOTING SYSTEM……

     “WE MUST WANT ONLY ON THE BALLET PAPER VOTING SYSTEM….!

      OTHERWISE, WE DON’T REGARD ANYTHING…..!

       वरील मेसेज टाईप करून आपले नाव, शहर,जिल्हा,राज्य टाकून मेल करावा……

              कारण……

   एखाद्या मुलाला मुलगी पसंद आहे,परंतू ,मुलीला त्या मुलाकडे चारित्र्य नसल्याने मुलगाच पसंद नसेल तर, मुलाकडच्यांनी स्पष्टीकरण देऊ नये की,मुलाला, मोठी नोकरी आहे,बंगला,गाड्या,बॅंकबॅलेंस,एकुलता एक वगैरे,अरे मुलीलाच मुलगा पसंद नसेल तर तुझा अट्टाहास का…..?

         हाच प्रश्न इथे आहे, रे सर्व जगाने अनुभव घेऊन EVM + VVPAT लाथाडलंय,जनतेचेच काय वकिलांचे आंदोलन या विरोधात रस्त्यावर उतरून चालू आहे,सर्वोच्च न्यायालयात सुद्धा वकिलांच्या बार असोसिएशनच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच होत असतांना,दिल्ली विधानसभेत आपच्या आमदाराने ( सॉफ्टवेअर इंजिनियरने ) EVM कशी हॅक होते, याचा डेमो करून दाखविले असतांना,एवढेच काय आ.एड.भानुप्रताप सिंग ( सुप्रीम कोर्टाचे वकील आणि आ.एड. नरेंद्र मिश्रा यांनी मुख्य निवडणूक आयोगाला 50, EVM + VVPAT मागितल्या आम्ही हॅक करून दाखवतो,हे आव्हान निवडणूक आयोग का स्वीकारत नाही.देवेंद्र फडणवीस तुमची बोलती आता का बंद झाली….?

            मोदी,शहा ( RSS ) तुमचा EVM +VVPAT वरच निवडणुका घेण्याचा अट्टाहास का….?

    म्हणून आमचा ( भारतीय जनतेचा ) तुमच्या EVM + VVPAT ला मरते दम तक विरोध…. 

       आम्ही काहीही करू,पण EVM + VVPAT ला जगाच्या वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही.

      येणाऱ्या सर्वच निवडणुका निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्यायला तुम्हाला भाग पाडू,जरी सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या बाजूने निकाल दिला तरी सुद्धा….. 

       त्यासाठी फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा या देशात आम्ही घडवून आणू………. 

          आवाहनकर्ता..

      अनंत केरबाजी भवरे 

( संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )