बिना परवानगी सागवान झाडे तोडणाऱ्या तिन आरोपींना अटक.. — दोन लाखाचा माल जप्त,गुन्हा दाखल. 

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-पारशिवनी वनपरीक्षेत्रा अंतर्गत मौजा डोरली येथील शेतकरी अविनाश नानेश्वर निकोसे यांनी वनविभागाची परवानगी न घेता सागवान वृक्ष तोडण्यासाठी विठ्ठल पाटील नामक व्यक्तींसी आपसी सौदा केला व झाडे तोडली.

         विना परवानगी सागवान झाडे तोडल्याची माहिती पारशिवनी परिक्षेत्राधिकारी यांना होताच त्यांनी संबंधित शेतकरी अविनाश नकोसे यांच्या शेतात जाऊन तोडलेली सागवान झाडे जप्त केली व विना परवानगी झाडे तोडणाऱ्या संबतितांवर गुन्हा दाखल केला.

           अविनाश नान्नेश्वर नकोसे रा. डोरली ता. पारशिवनी,जिल्हा-नागपूर यांनी त्यांचे शेतातील सागवन झाडे बिनापरवानगी कापण्याकरीता आकाश विठल पाटील वय – 40 वर्ष,रा. हिंगणा (बाराभाई) यांचे मध्यस्थीने नितेश हरीभाऊ सातपुते,वय – 42 वर्ष रा.नागपूर यांना विकले होते. 

          आरोपी नितेश हरीभाऊ सातपूते रा.नागपूर यांनी वृक्षअधिकारी तथा वनपरीक्षेत्र अधिकारी पारशिवनी यांचे कडून रीतसर परवानगी घेवून सागवन झाडे कापणे आवश्यक होते.

         परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अवैद्य पणे शेतातील सागवन झाडे कापली व त्यावर बनावट हॅमर उमटवून माल वाहतूक करण्याचा प्रयत्न केला.

         त्यामूळे,आरोपी अविनाश नानेश्वर निकोसे रा. डोरली,ता.पारशिवनी,आकाश विठठ्ल पाटील रा.हिंगंणा (बाराभाई) व नितेश हरीभाऊ सातपूते रा. नागपूर यांना वनविभागाचे महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे कलम 3 व 4 तसेच भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 83 (1) व (2) नुसार अटक करण्यात आली.

          आरोपीकडून एकूण 2 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास श्रीभारतसिंग हाडा उपवनसंरक्षक नागपूर व श्री. हरवीरसिंग सहायक वनसंरक्षक रामटेक,यांचे मार्गदर्शनाखाली श्री.ए.बी.भगत वनपरीक्षेत्र अधिकारी पारशिवनी व श्री. एच.एम.वाढई क्षेत्र सहायक पारशिवनी हे करीत आहेत.