स्व.कर्मवीर मा. सां. उपाख्य दादासाहेब कन्नमवार जयंती निमित्त बाईक रॅली व निबंध स्पर्धेचे आयोजन…

     रोहन आदेवार

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

       वर्धा/यवतमाळ

वर्धा: कर्मवीर मा.सां. उपाख्य दादासाहेब कन्नमवार जयंती उत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा.स. दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली व जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

           सर्वप्रथम स्व. कर्मवीर मा. सां. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेचे पूजन हनुमान देवस्थान, सोशालिस्ट चौक, वर्धा येथे करून बाईक रॅली सोशालिस्ट चौक, वर्धा येथुन सुरू होऊन शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी चौक ते माँ जिजाऊ स्मारक, धुनीवाला मठ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जमनालाल बजाज पुतळा ते लालबहादुर शास्त्री पुतळा, शास्त्री चौक ते राष्ट्रसंत तुकडोजी चौक, आवीं नाका ते जनहित मंच, मुक्तांगण, आय. टी. आय. टेकडी, वर्धा या मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. व निबंध स्पर्धा ही गट अ व गट ब मध्ये घेण्यात येणार असून दोन्ही गटातील विजेत्यांसाठी रोख रूपये व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच अ गटातील 3 व ब गटातील 3 प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येणार आहे. 

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार, पंकजभाऊ भोयर (वर्धा विधानसभा मतदार क्षेत्र) तर प्रमुख अतिथी म्हणून संजयभाऊ इंगळे तिगांवकर (सुप्रसिद्ध गझलकार, साहित्यीक तथा पत्रकार) व सतिशजी बावसे (अध्यक्ष, जनहित मंच, वर्धा) हे उपस्थित राहणार आहे.

            तरी बाईक रॅली व बक्षिस वितरण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे हि विनंती आयोजकांमार्फत करण्यात आलेली आहे.