भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
नितीन गडकरी यांच्या सीएसआर फंडातून धानोरा तालुक्यातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ.अशोक नेते तसेच ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली साईनाथ साळवे यांच्या विशेष प्रयत्नांचे धानोरा तालुक्यातील नागरिकांनाही विशेष भेट मिळालेली आहे.

धानोरा तालुक्यातील नागरिकांना त्वरित आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ही रुग्णवाहिका २४ तासांसाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर अगदी अल्प दरात कार्यरत राहणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सारंग साळवे यांनी विशेष लक्ष देऊन महत्त्वपूर्ण समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना ही अत्यंत उपयुक्त सुविधा उपलब्ध झाली आहे.
या रुग्णवाहिका सुविधेमुळे धानोरा तालुक्यातील रुग्णांना तातडीच्या सेवेसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. रुग्णावाहीका उपलब्ध झाल्यामुळे सर्व नागरिकांनी आभार मानले.



