बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे गुरुदत्त जयंती उत्सव सप्ताहाचा भव्य समारोप श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
गेल्या आठवडाभर चाललेल्या उत्सवाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध धार्मिक कार्यक्रम, भजन,भारुड, प्रवचन आणि सेवा उपक्रमांनी गुरुदत्त भक्तीत रंगुन गेले. समारोपाच्या दिवशी आयोजित काल्याच्या कीर्तनावेळी सभा मडम परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.
श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराजांनी गुरुदेव दत्तांच्या चरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांचे सुंदर वर्णन करताना भक्तांना अध्यात्म, नैतिकता आणि सदाचरणाचा संदेश दिला. त्यांच्या गोड आवाजात कीर्तनामुळे उपस्थित भाविकांना आनंद झाला.
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजक विद्यमान सरपंच आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक, सहित सर्व भाविक भक्तांच्या वतीने नियोजन करण्यात आले.
शेवटी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजक चेअरमन निलेश मच्छिंद्र बोडके व ज्ञानदेव मच्छिंद्र बोडके (मेजर) यांच्या वतीने करण्यात आले होते. चार हजारांहून अधिक भाविकांनी मह प्रसादाचा लाभ घेतला. आयोजक मंडळाकडून संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले.
गुरुदत्त जयंती उत्सव सप्ताहातील सर्व कार्यक्रम भक्तिमय आणि अनुशासित पद्धतीने पार पडल्याने भाविकांत समाधान व्यक्त होत आहे.
आठ दिवस संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप महेश सुतार यांनी केले. काल्याचा महाप्रसाद घेऊन सप्ताहाची सांगता झाली.



