Home Social गांधीनगर येथे श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन महोत्सव उत्साहात साजरा… —...

गांधीनगर येथे श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन महोत्सव उत्साहात साजरा… — श्री गोविंद प्रभू सेवा मंडळातर्फे विविध कार्यक्रमाची रेलचेल… — आमदार रामदास मसराम यांची विशेष उपस्थिती…

 पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

  दखल न्यूज भारत

   देसाईगंज तालुक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधीनगर गावात श्री गोविंद प्रभू सेवा मंडळातर्फे प्रथमच गांधीनगर गावात श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  

      सकाळी श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिनानिमित्ताने कार्यक्रम ठिकाणापासून ते संपूर्ण गावातून श्री दत्तात्रेय प्रभु यांची भव्य दिंडी मोठ्या गजरात काढण्यात आली. या दिंडीमध्ये महिला, – पुरुष मोठ्या संख्येने सहभाग दिसून झाले होते. दिंडी मार्गावर ग्रामस्थांनी घरासमोर सुंदर सडा रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत केले. दिंडीवर पुष्पवर्षाव करत भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेकांनी घरासमोर येणाऱ्या दत्त दिंडीचे विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले.

         श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले. यामुळे संपूर्ण गांधीनगर येथील वातावरण श्री प्रभू दत्तात्रेय गजराने दुमदुमून गेले. दरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा धार्मिक कार्यात अग्रेसित असल्याचे पाहू जाता मंडळाकडून विशेष अतिथी म्हणून त्यांना बोलाविण्यात आले होते.

         यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिनानिमित्ताने भाविकांना संबोधित करताना आमदार मसराम म्हणाले, दत्त म्हणजे दान करणे, श्री दत्तात्रेय दत्त हे महानुभाव पंथाचे आद्य गुरुदेव आहेत, त्यांना परमगुरू मानले जाते, त्यांची उपासना गुरुस्वरुपात करायची असते, दत्ताच्या उपासनेतून सामाजिक बांधिलकी जोपासावी, प्रत्येकाच्या घरा दारात, देव कर्म करणे गरजेचे आहे, श्री प्रभू दत्तात्रेय पासून आपल्याला कळत नकळत खूप काही लाभ मिळत असतो, दत्तात्रेय प्रभूंच्या अवतारांबद्दलची माहिती धार्मिक ग्रंथ आणि कथांमधून मिळते, जे मार्गदर्शन आणि धर्माच्या रक्षणासाठी वेळोवेळी अवतरले, आपली जबाबदारी आहे समाजा – समाजात तेढ निर्माण न करता सर्वांनी एकोप्याने समाजहिताच्या कार्यासाठी पुढे यावे, आपल्या गावात आयोजित अशा धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन यावेळी रामदास मसराम यांनी केले. 

    याप्रसंगी देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नितीन राऊत, मिसार सर, नागपूर अखिल भारतीय परमार्ग चिंतन परिषद नागपूर अध्यक्ष प. पू. म. पाटणकर, सारंगर नागपूर, उद्धवराज न्यायबास, माधेराज न्यायबास, खेईभट पंजाबी, गोपीराज यक्षदेव, देवराज कपाटे, हरि शिवणेकर, गोविंदराज आंबेकर, तपश्विनी शीला महानुभाव, धुलीचंद तुरकर, गांधीनगर ग्रामपंचायती हे उपसरपंच नेताजी सोंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

     शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ…

     श्री दत्तात्रेय प्रभु अवतार महोत्सव निमित्याने सकाळी दिंडी मोठ्या गजरात गांधीनगर गावातून काढण्यात आली. त्यानंतर प्रवचनास सुरुवात करण्यात आली. दुपारी गोपालकाला व महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, यावेळी महानुभव पंथी बहुसंख्य महिला वर्ग, ग्रामस्थ उपस्थिती होते. 

    कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी, रूपचंद गुरनुले, सुरेश गुरनुले, वसंता फुंडे, विशाल चहांदे, विजय गावतुरे, प्रवीण गावतुरे, अनिल गावतुरे, कैलास गावतुरे, गुणांनंद गावतुरे, शामा निकोडे, पुरोहित निकोडे, कुंडलिक गावतुरे, प्रमोद मोहुर्ले, नरेंद्र मोहुर्ले, रविंद्र मोहुर्ले, प्रभाकर मोहुर्ले, चंद्रभान मोहुर्ले आदी श्री गोविंद प्रभू सेवा मंडळाच्या सदस्यांनी व ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागामुळे महोत्सव यशस्वीरित्या पार पडले.