समाजसेवक श्री.झामदेव येवले यांना सेवाव्रती व पत्रकार रवी भोंगाने यांना वनश्री पुरस्कार जाहीर..

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

साकोली – येथील समाजसेवक झामदेव येवले व पत्रकार रवी भोंगाने यांना विदर्भात प्रतिष्ठित मानला जाणारा शामराव बापू कापगते प्रतिष्ठानचा,”सेवाव्रती तथा वनश्री पुरस्कार,जाहीर झाला आहे.

           सदर पुरस्कार त्यांना 23 डिसेंबर 2023 रोजी श्री संत लहरी बाबा मठ परिसरात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

            श्री.झामदेव येवले यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे.त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यात समर्पण केले. आपला वेळ व आपली शक्ती दुसऱ्यांना मदत करण्यात घालवली.ते आजही श्री.संप्रदाय यांच्या माध्यमातून आपली पूर्ण वेळ समाजातील सर्व घटकांना मदत करण्यात देत आहेत.

            पत्रकार रवी भोंगाने यांनी 2017 पासून आई शकुंतला यांच्या स्मृतिपित्त दीड किलोमीटर अंतरावर वृक्ष लावून त्यांनी पर्यावरणाचा वसा जोपासला.याकरिता त्यांना शामरावबापू कापगते प्रतिष्ठान तर्फे वनश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.