Home Political एहेतेशाम अली भाजपचे नव्हे, प्रहार पक्षाचे सदस्य होते!… — काँग्रेसने खोटा...

एहेतेशाम अली भाजपचे नव्हे, प्रहार पक्षाचे सदस्य होते!… — काँग्रेसने खोटा प्रचार थांबवावा… — भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुनेद खान यांची माहिती…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

चिमूर :- वरोरा येथील माजी नगराध्यक्ष एहेतेशाम अली यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अशा बातम्या सोशल मीडियावर आणि काही वर्तमानपत्रांत झळकल्या. मात्र, प्रत्यक्षात अली यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपचा राजीनामा देऊन प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला होता आणि वरोरा विधानसभा मतदारसंघातून प्रहार पक्षाच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती. ही माहिती चिमूर येथे आले असता भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

      जुनेद खान यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी नागपूर येथे एहेतेशाम अली यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संकपाळ व चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अली यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.

     मात्र वस्तुस्थिती अशी आहे की अली हे त्या वेळी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात सक्रिय होते आणि त्यांनी विधानसभा निवडणूक देखील त्याच पक्षाकडून लढवली होती. त्यामुळे अली आणि भाजपचा संबंधच उरला नव्हता. त्यामुळे काँग्रेसने खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार त्वरित थांबवावा व खरी परिस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी केली.