रामदास ठुसे/शुभम गजभिये
चिमूर :- विधानसभा निवडणुक दरम्यान विद्यमान व पुर्वीच्या सरकारने शेतक-यांना सरसकट कर्ज मुक्तीचे आश्वासन दिले होते.पण,जवळपास एक वर्ष उलटुनही याविषयावर कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही.
त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती,दुष्काळ,अवकाळी पाऊस,गारपीट उत्पादन खर्चातील वाढ,महागडी खते,औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.
पिकांचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असुन उत्पादन खर्च वसुल करणे देखील कठीण झाले आहे.शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजिविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव,योग्य बाजारभाव नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत.
अनेकांना थकबाकीमुळे नोटीसा,जप्ती कार्यवाही,काहीकडुन तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहे.दिवसेंदिवस त्याचे आकडे वाढत आहेत.
या पार्श्वभुमीवर शेतक-यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे.ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर,यामध्ये थकबाकीदार,चालु बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पिक कर्ज,मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज,शेडनेट,पॉलीहाऊ स,दुध उत्पादक शेतक-यांनी घेतलेले कर्ज,तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ठ करण्यात यावे याकरिता चिमूर तालुका शिवसेना उ.बा.ठा. मार्फत उपविभागीय अधिकारी चिमूर यांना आज निवेदन दिले.
“प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत”….
१) अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी शेतक-यांना हेक्टरी रुपये ५० हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरीत जाहीर करावी.
(२) नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतक-यांना सर्व कर्जातुन कर्जमुक्त करावे.
(३) पिक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथील करुन पंचनाम्याची प्रक्रिया बाजुला ठेवत विम्याची रक्कम त्वरीत शेतक-यांच्या खात्यात जमा करावी.
(४) अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना,जुने निकष न लावता,योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरीत देण्यात यावा.
याकरिता चिमूर तालुका शिवसेना उ.बा.ठा. मार्फत उपविभागीय अधिकारी चिमूर यांना निवेदन दिले.



