Home Social महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी…

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

चिमूर :- राष्ट्रसंत तुकडोजी सार्वजनिक वाचनालय,सोनेगांव (सिरास), ता.चिमूर, जि. चंद्रपूर येथे 2 ऑक्टोंबर 2025 रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्याने परिसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रम इ. घेवून साजरे करण्यात आले. 

      महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री हे देशाचे प्रतिक आहे असे प्रतिपादन व्याख्यान समयी माजी बालकल्याण सभापती,नगर परिषद चिमूर सौ.जयश्रीताई निवटे यांनी केले.

       या व्याख्यानात महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी सविस्तर विवेचन केले.ही महान व समृध्द प्रतिके आपण जपली पाहिजे असे प्रतिपादन पदवीधर विचारवंत श्री.अक्षय झाडे सर यांनी केले.

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच श्री.पुरुषोत्तम गजभिये हे होते,प्रमुख पाहूणे म्हणून झाडे सर,निवटे मॅडम,दिनेशरावजी सातपुते हे आवर्जून उपस्थित केले.

     ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ समाजसेवक रमेश भोयर हे होते.सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे किरण करारे यांनी केले.