दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठी आज प्रशासनाकडून प्रभागनिहाय आरक्षणाची घोषणा करण्यात आली. या आरक्षण सोडतीनंतर नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकूण प्रभागनिहाय आरक्षणात महिलांसाठी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ठराविक प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील प्रभागांमध्ये मात्र तीव्र स्पर्धा होणार असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग १ ते ९ मध्ये प्रत्येकी दोन जागा तर प्रभाग १० मध्ये तीन जागा असणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सोडतीनुसार काही विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागांचे आरक्षण बदलल्याने अनेकांना आपापले राजकीय गणित नव्याने मांडावे लागणार आहे. तसेच काही ठिकाणी महिलांसाठी आरक्षण लागू झाल्याने स्थानिक पातळीवर नव्या महिला नेतृत्वाला संधी मिळणार आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लोकसंख्येच्या घनतेचा, प्रवर्गीय प्रमाणाचा आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ही प्रभागनिहाय आरक्षण सोडत पार पाडण्यात आली.दरम्यान, या आरक्षणाविरोधात हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी काही दिवसांची मुदत प्रशासनाने दिली आहे. त्यानंतर अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रभाग 1 ; अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ( महिला) ब) सर्वसाधारण
प्रभाग 2 ; अ) अनुसुचित जाती (महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 3 ; अ) सर्व साधारण (महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 4: अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 5: अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग 6 : अ) सर्वसाधारण( महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 7 : अ) सर्व साधारण ( महिला), ब) सर्वसाधारण
प्रभाग 8: अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग 9 : अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग 10 ; अ) अनुसुचित जाती, ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) क) सर्व साधारण (महिला)



