प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी द्वारा नागपूर येथे तिन दिवसीय कांशीरामजी मेळाव्याचे व भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर तिन दिवशीय मेळावा व कार्यक्रम डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन नागपूर येथे पार पाडल्या जाणार आहे.
मान्यवर कांशीरामजी व भव्य कार्यक्रमाचे उदघाटन विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानसभा ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे हस्ते आज साडेचार वाजता होणार आहे.
तिन दिवसीय चालणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.सुरेश माने भुषविणार आहेत.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून प्रशिध्द बहुजन इतिहासकार प्रा.म.मा.देशमुख प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.
भारताचे प्रशिध्द गायक व प्रबोधनकार अनुरुध्द शेवाळ यांचे द्वारा प्रबोधनाचा कार्यक्रम सुध्दा होणार आहे…
तिन दिवस चालणाऱ्या मान्य.कांशीरामजी मेळाव्याला व भव कार्यक्रमाला विदर्भातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.तसेच महाराष्ट्र राज्यातील महत्वपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते सुध्दा सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नागपूरडे रवाना झाले आहेत.