माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऊमराह हज वरून येणाऱ्या नफिसा शेख यांचा करण्यात आला सत्कार….

 

बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

           पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे माजी मंत्री तथा इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नफिसा शेख व नबीलाल शेख यांचा हार शाल श्रीफळ व फुलाचा गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

          नफिसा शेख यांनी पर राज्यातून ऊमराह हज यात्रा करून आल्याबद्दल त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला. या निमित्त माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा शेख परिवाराच्या वतीने नबीलाल शेख व बाळासाहेब शेख यांच्या हस्ते हार फेटा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

            उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका आध्यक्ष हानुमंत कोकाटे , सुरेश शिंदे ,श्रीकांत बोडके , सरपंच भाग्यश्री बोडके ,सुदर्शन बोडके ,संतोष सुतार ,यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला . पिंपरी बुद्रुक येथील नबीलाल शेख परिवाराच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे उपस्थितीत राहिल्याबद्दल शेख परिवाराच्या वतीने आभार व्यक्त केले.

        सदर कार्यक्रमासाठी पिंपरी बुद्रुक मधील ग्रामस्थ बाळासाहेब शेख ,नबीलाल शेख ,सिकंदर शेख , पैगंबर शेख ,शब्बीर शेख , दस्तगीर शेख , पिरकन शेख ,नाता सुतार , आंसर शेख ,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.