Home Social आळंदीत उद्या ओळख,श्री.ज्ञानेश्वरी उपक्रमा अंतर्गत अध्यापकांसाठी प्रशिक्षण वर्ग….

आळंदीत उद्या ओळख,श्री.ज्ञानेश्वरी उपक्रमा अंतर्गत अध्यापकांसाठी प्रशिक्षण वर्ग….

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : माऊलींच्या साहित्याची महत्ती सर्वत्र आहे. माऊलींच्या व त्यांच्या साहित्याच्या सानिध्यात राहणे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जोडीला तत्वज्ञानाची सांगड घालून हे तत्त्वज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी.

       तंत्रज्ञानाच्या जोडीला तत्त्वज्ञानाची सांगड घालत समाज घडवावा, एक चांगला व आदर्श विद्यार्थी घडविण्याचा उद्दात हेतू उराशी बाळगून शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ एक संस्कारक्षम उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमांच्या अंतर्गत आळंदीत श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, पत्रकार संघ आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमातील अध्यापकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सोमवार (दि.9) रोजी ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे असे ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, पत्रकार संघाचे अर्जुन मेदनकर उपस्थित होते.

      ओळख श्री. ज्ञानेश्वरीची या उपक्रमा अंतर्गत सहभागी संस्था व शाळांच्या अध्यापकांसाठी दोन सत्रात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात उद्घाटन सोहळा माजी समेलनाध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते, व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

       यावेळी विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोढे, विश्वस्त डॉ.अभय टिळक, सुभाष महाराज गेठे उपस्थित राहणार आहे. तसेच दुपारच्या सत्रातील प्रशिक्षण वर्ग पालखी सोहळाप्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ.नारायण महाराज जाधव, संपादक सम्राट फडणीस, शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, प्राचार्य डॉ.सुरेंद्र हेरकळ, आळंदी देवस्थानचे विश्वस्त महंत पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहिणी पवार उपस्थित रहाणार आहे.