ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : तालुक्यातील एकोडी येथील रहिवासी व ग्रा.प.सदस्य भावेश कोटांगले यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कृत कै. शाहीर साबळे, कै. सुधीर भट, कै. स्मिता तळवळकर, कै. आनंद अभ्यंकर स्मृती प्रित्यर्थ लोककला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लोककला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची ही एक मोठी पावती मानली जात आहे तसेच लोककला क्षेत्रासाठी व भंडारा जिल्हासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून लोककलेच्या प्रचार प्रसार तसेच विविध कार्यक्रमातून लोककला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले. हा पुरस्कार 14 जून 2025रोजी दुपारी चार वाजता परिषदेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध सिनेअभिनेते प्रशांत दामले व उपाध्यक्ष झाडीपट्टी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध नाट्य कलावंत नरेश गडेकर यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिर मनमाड टॅंक रोड माटुंगा मुंबई या ठिकाणी त्यांना प्रदान केला जाणार आहे.
त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार संघटना, झाडीपट्टी वादक संघटना व परिसरातील जनते कडून शुभेच्छा मिळत आहेत.



