Home Maharashtra शाँर्टसर्कीटमुळे उसेगांव जवळील स्मशानभुमी जवळ पोकलँडला आग…

शाँर्टसर्कीटमुळे उसेगांव जवळील स्मशानभुमी जवळ पोकलँडला आग…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

    चिमूर तालुकतंर्गत मौजा उसेगांव जवळील स्मशानभुमी जवळ भर दुपारी १.३० वाजता ७ जुन शनीवारला क्रेन मार्गक्रमण करीत असताना विजेच्या पोलचा जिवंत तार लागुन शार्क सर्कीट होऊन क्रेन ला आग लागली.क्रेनच्या चालकाला वैद्यकीय उपचारार्थ चिमूरला हलवीण्यात आले होते.

       सवीस्तर वृत्त असे आहे कि,एम.के.एस कंपनीची मालमत्ता आणण्यासाठी नेरी – उसेगांव मार्गे पळसगांव (पी.) ला मटेरीयल शीप्टींगसाठी जाणार होती.ही क्रेन खुराणा यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले.चालक हा शंकरपुर येथील असल्याचे या कंपनीच्या कामगारांनी सांगीतले.

           क्रेन मार्गक्रमण करीत असतानी उसेगांव जवळील स्मशानभुमी जवळ रस्त्यालगत असलेल्या विद्युत पोलच्या जिवंत ताराला क्रेन चा स्पर्श झाला आणी घटकेतच क्रेननी पेट घेतला.

       या क्रेन चालकाला सुध्दा करंट झटका पोहचला.वेळ न घालवता चालकांनी कबीनमधुन उडी मारली आणी लगेच वेळ घालवता हेल्परनी गाडी बोलावून चालकाला वैद्यकीय उपचारासाठी चिमुरला हलवीण्यात आले.

      तसेच वीद्युत वीभागाला तुरंत नागरीकांनी कळविल्याने उसेगांवचे लाईन मेन नन्नावरे यांनी लगेच सीटडाऊन घेतले व स्वता घटनास्थळी उपस्थीत होते.

       चिमूर नगरपरीषदेची अग्नीशमन दलाची सुध्दा गाडी वेळेवर पोहचुन क्रेन ला लागलेली आग वीझवीण्यात आली.पण तोपर्यंत क्रेन बऱ्याच पैकी जळालेली होती.

      बऱ्याच वेळपर्यंत नेरीला जाणारे व वाघेडाकडे जाणारे प्रवासी अडकुन होते.आग वीझवीण्यासाणी उसेगांव येथील नागरीकांनी मदत केली.मात्र,समयसुचकेतेमुळे होणारी जीवीतहानी टळली.