Home Social बाबुपेट येथील इसमाची सिंदेवाही परिसरात आत्महत्या…

बाबुपेट येथील इसमाची सिंदेवाही परिसरात आत्महत्या…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी 

दखल न्यूज़ भारत

सिंदेवाही :- दिनांक ०६/०६/२०२५ रोजी नामे . लता सुनिल टिकरे पोलीस पाटील मेंढा माल ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर यानी पो.स्टे.ला येवुन तोंडी रिपोर्ट दिला की. मौजा मेंढामाल ते चारगाव बडगे डांबरी रोडला लागुन असलेल्या जंगल शिवारात एक ईसम गळफास घेवुन मरण पावला आहे.

        अशा माहिती वरून पो.स्टे. सिंदेवाही पोलीस घटनास्थळावर जावुन पंचनामा कार्यवाही करून मृतकच्या प्रेताची पंचासमक्ष पाहणी केली असता मृतकचे पॅन्टचे खिशातुन मृतकचा आधार कार्ड व त्याचे पत्नीचा आधार कार्ड व एक मोबाईल मिळुन आला. आधार कार्डवर ओमप्रकाश पत्रुजी ठाकरे वय २९ वर्ष रा. बाबुपेठ आंबेडकर नगर चंद्रपुर असे असल्याने आधार कार्ड वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क करून सदर बाबतची माहिती त्यांचे नातेवाईकांना देण्यात आली. प्रेतास पिएम कामी ग्रा.रू. सिंदेवाही येथे आणण्यात आले.

         पोलीस पाटील नामे लता सुनिल टिकरे पोलीस पाटील मेंढा माल ता. सिंदेवाही यांचे तोडी रिपोर्ट वरून पो.स्टे. सिंदेवाही येथे मर्ग क्र. ३३/२०२५ कलम १९४ BNSS अन्वये नोंद करून नातेवाईकांकडुन मृतकचे ओळख पटविण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर मर्ग तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.