राजकिय क्षेञातिल मान्यवरांच्या उपस्थितित वैद्यराज कावळेंनी केले दमा औषधी चे वितरण ….  हजारोंनी घेतला लाभ…

ऋषी सहारे

संपादक

 वडसा – मृग नक्षञाच्या पर्वावर कोकडी चे प्रसिद्ध दमा औषधी वैद्य प्रल्हाद कावळे यांनी देसाईगंज च्या आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात आज सायंकाळी ६ वाजता मृग नक्षञाच्या पर्वावर राजकिय क्षेञातिल मान्यवरांच्या उपस्थितित दमा औषधीचे वितरण केले. देसाईगंज तालुक्यातिल कोकडी या ठिकाणी मागिल २८ वर्षापासुन वैद्यराज प्रल्हाद कावळे सेवाभावी वृत्तीने दमा रुग्णांची मोफत औषधी देवुन सातत्याने सेवा करत आहेत. मागिल दोन वर्ष हे कोरोणा काळाचे प्रतिबंधक असल्याने दमा औषधी चे वितरण होऊ शकले नाही सोबतच कोकडी हे लहाण खेडे असल्याने तेथिल सर्वसामान्य गावकर्यांनी औषधीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रुग्णांची सोय केली होती. त्यांना अतिरिक्त भुर्दंडही सहन करावा लागत होता शिवाय प्रवाशांना ही ञास सहन करावा लागत होता. देसाईगंज ही व्यापार नगरी असल्याने व प्रवासाच्या सोयी साठी उपलब्ध असल्याने देसाईगंज चे माजी नप उपाध्यक्ष तथा नुतन शिक्षन प्रसारक मंडळाचे सचिव आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतिलालजी कुकरेजा यांनी देसाईगंज शहरातच दमा औषधी चे वितरण व्हावे अशी जिज्ञासा मनात बाळगली व त्यांनी आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रांगणात दमा औषधी वितरित करण्याचा बेत आखला आणि वैद्यराज प्रल्हाद कावळे यांना घेवुन स्थानिक आमदार कृष्णा गजबे व प्रतिष्ठित व्यापार्यांच्या भेटी घेवुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यथोचित प्रयत्न केले त्याची फलश्रृती म्हनुण आज हजारो दमा रुग्णांचे जत्थेचे जत्थे आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर येत असल्याने हा कार्यक्रम १०० टक्के यशस्वी झाला. या कार्यक्रमाला सदिच्छा भेट म्हनुण खासदार अशोक नेते कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले माजि मंञी विजय वडेट्टीवार,भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आम कृष्णा गजबे,माजी आम. डॉ नामदेवराव उसेंडी, माजी आम. आनंदराव गेडाम , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा , माजि नगराध्यक्षा शालु दंडवते, हसन गिलानी , डॉ नामदेव किरसान, डॉ नितिन कोडवते, भाजपा तालुकाध्यक्ष राजु जेठानी, राजु रासेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा, माजि नगरसेवक संतोष श्यामदासानी, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण माजि सभापती रोशनी पारधी , पं स माजि उपसभापती अर्चना ढोरे ,माजि पं स सभापती परसरामजी टिकले, नितिन राऊत ,वसंता दोनाडकर यांचेसह सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात औषधी रुणांना पिण्याच्या पाण्याचे स्टॉल शरबत चे स्टॉल, भोजनाची व्यवस्था, विविध समाज संघटना कार्यालयिन कर्मचारी व व्यापारी संघटनेच्या वतिने करण्यात आले. या प्रसंगी आम. कृष्णा गजबे, आम. विजय वडेट्टीवार,किशन नागदेवे, डॉ नामदेव उसेंडी, मोतिलाल कुकरेजा, आनंदराव गेडाम यांनी वैद्यराज कावळे यांचा शाल व श्रिफळ देवुन सपत्निक सत्कार केला.