Home Maharashtra वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा भिसीवासींयांसाठी ठरतो आहे संतापजनक… — उपाययोजना...

वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा भिसीवासींयांसाठी ठरतो आहे संतापजनक… — उपाययोजना नागरिकांनी करायच्या काय? — कमालीचे दुर्लक्ष!..

 

 प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

     चंद्रपूर जिल्हातंर्गत मौजा भिसी गाव हे अप्पर तालुक्याचे ठिकाण आहे.तद्वतच नगरपंचायत म्हणून सुध्दा विविध कामातंर्गत वळण घेतो आहे,विस्तारतो आहे.

        मात्र या ठिकाणचा दिवसा व रात्रोला वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा हा भिसीवासींयासाठी संतापजनक डोकेदुखी ठरू लागला आहे.

            मौजा भिसी सह इतर गावांचा विद्युत पुरवठा केव्हा बंद केला जाईल किंवा खंडित होईल याचा नेम नाही,अशा पध्दतीची चिंताजनक स्थिती सध्यास्थित भिसी व परिसरातील विद्युत ग्राहक अनुभवताना दिसत आहेत.

         विज वितरण कंपनी कनिष्ठ अभियंता भिसीच्या कार्यालयातंर्गत कनिष्ठ अभियंता,लाईनमन व त्यांचे सहकारी वारंवार होणाऱ्या खंडित विद्युत पुरवठ्याकडे जातीने लक्ष केंद्रित करतील काय?हा प्रश्न भिसीवासींयासाठी सध्यातरी गंभीर बनला आहे.

          भिसी येथील वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा हा एक दोन किंवा पाच मिनिटांसाठी होत नाही तर त्याचा वेळ सांगणे अवघड असते.मात्र महत्वपूर्ण मुद्दा हा आहे की भिसी येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित का म्हणून होतोय?

      विद्युत खंडित दिवसा होतोय पण रात्रोच्या वेळी सुध्दा अनेकदा होतोय.यामुळे विज वितरण कंपनी कनिष्ठ अभियंता कार्यलय भिसी अंतर्गत कर्तव्यावर असलेले कनिष्ठ अभियंता,लाईनमन व त्यांचे सहकारी यांच्या कार्यपद्धतीवर भिसी व परिसरातील नागरिक कमालीचे नाराज आहेत व त्यांच्या गलथान कारभारामुळे हैराण झाले आहेत.

        वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा होऊच नये यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी भिसी येथील नागरिकांनी घ्यायची काय? याबाबत तरी सार्वजनिकरित्या खुलासा कनिष्ठ अभियंता यांनी करणे आवश्यक आहे.

             वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे कारणे काहीही असोत,मात्र याकडे विज वितरण कंपनीच्या संबंधितांचे होणारे दुर्लक्ष भिसीवासींयासाठी संतापजनक ठरत आहे,या वास्तव्याला नाकारुन चालणार नाही…