रिक्षाचालक साधू मगरच्या मागे सरकार खंबीरपणे उभे : आमदार श्रीकांत भारतीय… — रिक्षाचालक मगर याचा घरी जाऊन केला सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

आळंदी : अनेक वाद विवादात ‘द केरला स्टोरी’ अखेर प्रदर्शित झाला आहे. एकीकडे लोक चित्रपटाचं समर्थन करत आहेत तर दुसरीकडे त्यावर टीका करत आहेत. ‘द केरला स्टोरी’ वरून सगळीकडे वातावरण तापलेलं आहे. या चित्रपटावरुन तिर्थक्षेत्र आळंदीतील एका रिक्षा चालकाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल झाली असून संबंधित रिक्षा चालकाला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. 

        दरम्यान हा प्रकार कळताच भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी सदर रिक्षा चालकाची आळंदीत त्याच्या घरी जाऊन भेट घेऊन त्याचा सन्मान केला आणि त्याला आधार देत राज्य सरकार आणि गृह विभाग त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले.‌ यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल देशमुख, भाजपचे नेते डॉ.राम गावडे, पुरुषोत्तम महाराज पाटील, अशोक उमरगेकर, किरण मुंगसे, गणेश गरुड, माऊली बनसोडे, आकाश जोशी उपस्थित होते.

काय आहे प्रकरण? 

साधू मगर असं या रिक्षा चालकाच नावं असून द केरला स्टोरी हा चित्रपट बघण्यासाठी जाणाऱ्या महिलांसाठी आपल्या रिक्षातून मोफत प्रवासाची सुविधा सुरू केली होती.

        आपल्या या उपक्रमाबद्दलची पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकली होती. ती पोस्ट बघून साधूला आधी कमेंटमध्ये धमकी दिल्या जात होत्या. नंतर आपल्याला फोनवरही जीवे मारण्याच्या धकम्या दिल्या गेल्याची तक्रार साधूने पोलिसांकडे केली. त्यानुसार त्याला संरक्षण देण्यात आलं आहे.