युवकांनी आर्थिक साक्षर होऊन गुंतवणुकीचे वेळीच नियोजन करावे :- राजवर्धन पाटील.

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

    नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेक्युरिटी मार्केट(NISM ) सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया( SEBI ) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी रोजी इंदापूर महाविद्यालयाच्या शाहीर अमर शेख सभागृहामध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना संस्थेचे संचालक युवा नेते राजवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आर्थिक साक्षर होऊन गुंतवणुकीचे नियोजन करावे असे मत व्यक्त केले. 

    सेबीचे प्रशिक्षक डॉ. विजयकुमार ककडे यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले.

     राजवर्धन पाटील म्हणाले की ,’ विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत आर्थिक साक्षर होणे आणि गुंतवणुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे.आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली ही महाविद्यालयाची खूप महत्त्वाची कामगिरी आहे.केवळ शैक्षणिक साक्षरता महत्त्वाची नसून युवकांनी शैक्षणिक साक्षरतेबरोबरच आर्थिक साक्षर झाले पाहिजे.’

    अर्थशास्त्राचे माजी विभाग प्रमुख कै.प्रा.बी.जी. चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ अर्थबोध या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

     डॉ. विजय ककडे यांनी कार्यशाळा आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा भविष्य काळात चांगला उपयोग होईल. अनेक महाविद्यालयाने कार्यशाळेकरिता प्रस्ताव पाठविल्यानंतर फार कमी महाविद्यालयास सेबीकडून आयोजनाची ही संधी प्राप्त होत असते आपल्या महाविद्यालयाला ही संधी मिळाली त्याबद्दल आपल्या महाविद्यालयाचे मनःपूर्वक अभिनंदन. विद्यार्थ्यांनी या संधीचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यावा. 

   प्राचार्य डॉ.जीवन सरवदे , डॉ.शिवाजी वीर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडाचे महत्त्व त्यांनी सांगितले.

  अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिमाजी भोर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश सांगितला.

    प्रा. डॉ. तानाजी कसबे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. 

    यावेळी डॉ.सुवर्णा सूर्यवंशी , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे , डॉ. प्रज्ञा लामतुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

        प्रा. श्याम सातार्ले यांनी सूत्रसंचालन केले.

     प्रा. अमोल सरडे यांनी आभार मानले.

 कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.अमोल थोरात आणि प्राध्यापिका अक्काबाई श्रीराम यांनी प्रयत्न केले.