इंडियन आयडाॅल स्पर्धेत गायक कु.उत्कर्ष वानखेडे याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन.. — कन्हान शहर विकास मंच द्वारे वृक्ष देऊन सत्कार..

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – कन्हान शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथील रहिवासी असलेला उत्कर्ष रविंद्र वानखेडे याने इंडियन आयडाॅल या संपुर्ण शो मध्ये स्वरांचे उत्तम सादरीकरण व गायन कलेचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केल्याने कन्हान शहर विकास मंच द्वारे वृक्ष देऊन सत्कार करण्यात आले.

         सोनी टीव्ही वाहिनीवर या वर्षी इंडियन आयडॉल या संगीतमय मालिकेचे सीझन सुरू झाले.उत्कर्ष वानखेडेला संगीतमय रियालिटी शो मध्ये ऑडीशन दिल्यानंतर त्यात उत्कर्षची स्पर्धेत निवड झाली. 

         उत्कर्ष ने एकापेक्षा एक सरस कामगिरी करत टॉप टेन मध्ये प्रवेश मिळविला आणि संपुर्ण शो मध्ये उत्तम कामगिरी करुन आपले स्वतःचे,परिवाराचे,कन्हान शहराचे नावलौकिक केले.

         कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी गायक उत्कर्ष रविंद्र वानखेडे यांचा निवासस्थानी जाऊन संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये उत्कर्ष वानखेडे ला वृक्ष देऊन सत्कार करण्यात आले.

     या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर,वामन देशमुख,चंद्रशेखर बावनकुळे,सुरज वरखडे,प्रदीप बावने,अर्जुन पात्रे,महेर इंचुलकर,प्रवीण इंचुलकर,नेम कांबळे,राहुल सोनबरसे सह आदि मंच पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते .