ओबीसी,एससी,एसटी,बांधवांनी वेळीच सावध व्हावे… — अन्यथा?

      सांसदीय लोकशाही संपली तर ९०% भारतीय जनतेच्या जीवनमानावर परिणाम होणार!

       भारताचा इतिहास साक्षी आहे,आपल्या देशात जनावरांना जगण्याची मुभा होती.परंतु स्त्री पुरुषांच्या अंकीत रहावी म्हणून ५०% संख्या असलेल्या महिलेवर अनेक प्रकारची बंधणे लादून तीला गुलामीची वागणूक मिळत होती,सांसदीय लोकशाही संपली तर पुन्हा त्याचं इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे हे समस्त महिला वर्गाने लक्षात घ्यावे….!! 

             सांसदीय लोकशाही ने ओबीसी ज्यांची संख्या ५२% आहे,त्यांना समतेचा हक्क आणि अधिकार प्रदान केला आहे.परंतु सांसदीय लोकशाही संपली तर ओबीसी पुन्हा शुद्र होणार आहे.अलुतेदार,बलुतेदार म्हणून जीवन जगावे लागणार आहे याची ओबीसी बांधवांनी वेळीच नोंद घ्यावी….!! 

              सांसदीय लोकशाही ने अनु जाती आणि जमाती ज्यांची संख्या २२% आहे त्यांना माणूसपणं बहाल केलं जर सांसदीय लोकशाही संपली तर एस.सी.-एस.टी. समुहाला पुन्हा जनावरापेक्षा हीन जगणं जगावे लागणार आहे,गावकुसाच्या बाहेर जावे लागणार आहे याची वेळीच नोंद घ्यावी….!! 

              जे जे अल्पसंख्याक आहेत त्यांना सांसदीय लोकशाही मधील समतेच्या अधिकारामुळे बरोबरीने जगण्याची संधी प्रदान केली आहे,परंतु जर सांसदीय लोकशाही संपली तर अल्पसंख्याक समुहाला अन्यायाचे बळी व्हावे लागेल याची अल्पसंख्याक समुहाने वेळीच नोंद घ्यावी…!! 

                 काळ आणिबाणीचा आहे,विचारांची मुस्कटदाबी केली जाते आहे आणि मुठभर विषमतावादी मुजोरी करीत आहेत…!! 

              देशाला आणि भारतीय समाजाला ४०० वर्षे मागे जाऊ द्यायचे नसेल तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी वरील चित्रापासुन बोध घ्यावा ही नम्र विनंती…!!

            लेखक 

      भास्कर भोजने.