Home कृषी देसाईगंज तालुक्यात शासकीय आधारभूत खरीप भात खरेदी केंद्राचा शुभारंभ !… —...

देसाईगंज तालुक्यात शासकीय आधारभूत खरीप भात खरेदी केंद्राचा शुभारंभ !… — आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते झाले उद्घाटन… — संचालक मंडळाची उपस्थिती…

 पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

देसाईगंज :- महाराष्ट्र स्टेट को-आॕपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.शासकीय आधारभूत भात खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या देसाईगंज केंद्राचे उद् घाटन देसाईगंज जवळ असलेल्या नैनपूर येथिल निरंकारी गोदाम मध्ये आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात दि.७रोजी करण्यात आले.

        शासकीय आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर देसाईगंज, किन्हाळा ,सावंगी केंद्र समाविष्ट गावातील शेतकऱ्यांचे धान देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था र.नं.१९०९ वडसा तर्फे भात (धान) खरेदी केली जाणार आहे.

       उद्घाटन सोहळ्याला देसाईगंज सहकारी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष अन्नाजी तुपट, माजी सभापती परसराम टिकले, धनपाल मिसार, माजी सभापती यादवराव ठाकरे , संचालक संजय पत्रे, व्यवस्थापक पी.के. तलमले , विष्णू दुनेदार , अरुण राजगीरे ,ज्ञानेश्वर बुल्ले , विवेक फुलझेले, सुधिर गायकवाड, गितेश मस्के ,सागर वाघाडे व शेतकरी प्रेमदास चहांदे उपस्थिती होते. यावेळी शेतकरी प्रेमदास चहांदे यांच्या धानाची मोजणी करुन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

         शासकीय आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर साधारण भात (धान ) व ग्रेड ए चे भात (धान) शासकीय दराने खरेदी केल्या जाणार आहे. शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ,असे आवाहन देसाईगंज सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.