Home Social जि.प.शाळा धानोरा शिक्रा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली…

जि.प.शाळा धानोरा शिक्रा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

  जि.प.शाळा धानोरा शिक्रा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्य आदरांजली वाहन्यात आली.

       प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष माधुरी सचिन पाटील, शकिला बानो, रेखा मारुती तामगाडगे,उपस्थित होत्या.युवा प्रशिक्षणार्थी सुरज जुनघरे यांनी गित सादर करून आदरांजली अर्पण केली. दिपक धांडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

        बहुजनांनी बाबासाहेबांचे कार्याचे स्मरण करीत, सतत जागरूक राहण्याची हीच वेळ आहे असे सूरज मंडे यांनी सूचित केले.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्वाचे गुण वैशिष्ट्ये यावर इयत्ता 3 री चा विद्यार्थी सुबोध योगिराज टेंभरे याने आपले मनोमगत व्यक्त केले. माधुरी सचिन पाटील, शकिला बानो आणि रेखा मारुती तामगाडगे, यांनी प्रासंगिक आपले विचार व्यक्त केले. 

        याप्रसंगी सुषमा जितेंद्र डोंगरे, सौरभ वसंत टेंभरे, दुर्गा पद्माकर खंबरे, धनश्री किशोर गरड, सार्थक प्रदिप चौधरी, विहान अनिल मारबदे, समर्थ अमोल पडोळे, पियूष सचिन शेंडे, सार्थक नितीन मेश्राम, विराज दशरथ मारबदे, प्रज्वल सचिन पाटील, अथर्व राहुल पडोळे, पलक रामपाल बद्रे, संविधान संतोष कांबळे, आरव नंदकिशोर मालगावे, वेदांत किशोर गरड, सानवि प्रफुल कांबळे, तन्वी निलेश मालगावे, दिव्यांनी विनोद टेंभरे, रीता नीलेश मालगावे, कृष्णा अंकुश शेंडे, गौरव सचिन शेंडे, यांचेसह सर्व विद्यार्थी व बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.