दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : संतभुमी अलंकापुरीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विशेष सहकार्यातून आरोग्यदीप प्रकल्पांतर्गत स्वास्थ्यम मेडिकल अँड सोशल फाउंडेशनचे डॉ.निलेश जगदाळे आणि सहकारी यांच्या माध्यमातून आळंदीकरांसाठी तसेच भाविक भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी ओपीडीचा शुभारंभ पालखी सोहळामालक हभप बाळासाहेब पवार आणि वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव बाजीराव नाना चंदीले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन मच्छिंद्र जगदाळे, विश्वस्त सुनंदा जगदाळे, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, हभप राजाभाऊ चोपदार, माजी नगरसेवक रामभाऊ भोसले, अशोक उमरगेकर, डॉ.सुनिल वाघमारे, आदेश उपाध्याय, तुकाराम माने, हमीद शेख, गोविंद ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पात आपले आरोग्य आमची जबाबदारी यामाध्यमातून आळंदीकरांसाठी आणि वारकरी भाविक भक्तांसाठी मोफत सेवा सुविधा,औषधांचे वाटप,गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रियेस मदत देण्यात येणार असल्याचे डॉ.निलेश जगदाळे यांनी सांगितले आहे. विविध आजारांवर मोफत तपासणी, वैद्यकीय सल्ला व शासकीय योजनांची माहिती देवून मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी सहकार्य देखील करण्यात येईल असे आश्वासन डॉ.जगदाळे यांनी दिले आहेत.