त्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल.. — चिमूर तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले… — चोर पोलिसांना गवसतच नाही? — चोरीच्या तक्रारी दाखल करायच्या नाहीत काय?

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

        वृत्त संपादीका

            मौजा नेरी येथे श्रिमती ललिता देवानंद कऱ्हाडे यांच्या घरी चोरी झाली.त्यांनी चोरी प्रकरणा बाबत चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध भांदवी कलम ३८०,४५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          चोरी झाली कि चोरीच्या तक्रार दाखल होतात.परंतू चोरी करणारे चोर हे पोलिसांना गवसतच नसल्याने चोरी प्रकरणाबाबत तक्रार दाखल करायची की नाही,हा प्रश्न चिमूर तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.

        काही दिवसातच चिमूर तालुक्यात विविध ठिकाणी चोरीच्या अनेक घटना घडल्यात‌.विविध ठिकाणी चोरी करणारे चोर हे गावातील आहेत की,तालुक्यातील भुरटे चोर आहेत,किंवा तरबेज चोर आहेत हेच कळायला मार्ग नाही.

          चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथे मंगळवारी पहाटेच्या दरम्यान श्रिमती ललिता देवानंद कऱ्हाडे यांच्या घरी चोरी झाली.मात्र चोरांचा शोध घेणारे पथक नेमले नसल्याने चोरांचा शोध लागणार की नाही हे सांगणे कठीण आहे.

        गोरगरीब नागरिकांच्या घरी होणाऱ्या चोरींच्या संबंधाने पोलीस चोरांचा शोध घेत नसतील तर चोरींचे प्रमाण वाढणार व वारंवार चोरी करण्यासंबंधाने चोरांचे धाडस वाढणार हे स्पष्ट आहे.