तहासिल कार्यालयाच्या प्रागणातुन कर्मचाऱ्यांचे दुचाकी वाहन गेले चोरीला. — पोलिसात गुन्हा दाखल,आरोपीचा शोध सुरू..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी:- तहसील कार्यालयातंर्गत अन्नपुरवठा विभागातील संगणक यांची बाईक तहसील कार्यालय पारसीवनीच्या प्रांगणातून चोरीला गेली असल्याची धक्कादायक घटना घडली.

       तहसील कार्यालय पारशिवनी येथील कार्यालयाच्या प्रागणात लॉक लाऊन मोटर सायकल क्रमांक एम.एच.४०,सिई. ६१४ ही उभी करून ठेवली होती.तीन वाजताच्या दरम्यान जेवण करण्याकरिता सदर कर्मचारी कार्यालयच्या प्रागणात आले असता त्यांची दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

        त्यांनी स्वत:च्या बाईकचा शोध आजूबाजूला व इतर ठिकाणी केला असता बाईक दिसून न आल्याने मोटार सायकल चोरीला गेल्याचा संशय बळावला. 

        दुचाकी हीरो डिलक्स क्रमाक एम.एच.४०,सि.ई.६१४ ची किंमत २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

       पोलिस सुत्रा व्दारे प्राप्त माहिती नुसार,पारशिवनी तालुक्यातील तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात संगणक चालक या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचारी अजय हरिश्चंद मरस्कोल्हे (वय २८वर्षे) यांच्या तक्रारी वरून पारशिवनी पोलिस स्टेशन येथे अपराध क्रमाक ८१/२४ कलम ३७९ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

      पोलिस निरिक्षक राहुल सोनवन यांचे मार्गदर्शनात पो. हवा.अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.