ब्रेकिंग न्यूज.. — मौंदा तहसिलचे अधिकारी असल्याचे सांगुन ट्रक चालकाकडून लुटले अकरा हजार..  — लुटणाऱ्यांना अटक..

कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड वरील सिंगारदिप बस स्टाप जवळ कन्हानकडे येणा-या टाटा टिप्पर चालकास स्विप्ट कारने येऊन ट्रक चालकास थांबविले व मौदा तहसिलचे अधिकारी असल्याचे सांगून आणि कारवाईची भिती दाखवीली.

      तद्वतच बोगस अधिकाऱ्यांनी धमकावून जबरीने चालकाकडून ११ रूपये हिसकावून घेतले.

       फिर्यादीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी कारसह दोघाना पकडून त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल केली व त्यांच्या विरुद्ध पुढील तपास करित आहे. 

          श्री.आकाश भाऊराव कांबळे वय ३० वर्ष धंदा- चालक मालक रा. सोनार मोहल्ला पिपरी कन्हान,ता. पारशिवनी,ह.मु. सोनेगाव (उनगाव) ता. कामठी जि.नागपुर असे तक्रारदाराचे नाव आहे.

        ते मागील २ वर्षापासुन सोनेगावला पत्नी व मुला बाळसह राहत असुन त्यानी टाटा एस टिप्पर ट्रक क्र.एमएच ३१ सीक्यु ६५७७ सन २०१९ ला विकत घेऊन सध्या पाचगाव वरून गिट्टीवर गाडी चालवित आहेत.

       आज बुधवार (दि.६) ला सकाळी पाचगावला जावुन गिट्टी भरून धानला गावी खाली करून तारसा रोडने कन्हानला गाडीचे काम करणे करीता येत असताना सिगारदिप बस स्टॉप जवळ सकाळी १० वाजता दरम्यान दोन अनोळखी इसम स्विप्ट डिजायर कार क्र. एमएच २७ एआर ५६८१ ने ट्रकचे पुढे येवुन गाडीला थाबण्याचा इशारा करून गाडी थाबवली. 

       कारचा ड्रायव्हर जवळ येवून आम्ही तहसिल मौदाचे अधिकारी आहोत असे म्हणुन रॉयल्टी विचारली व कार मध्ये बसलेल्या साहेबाना जावुन भेट असे म्हटल्याने आकाश कांबळे खाली उतरून कार मधील इसमाला भेटले असता तो दारु पेवुन होता.त्याने रायल्टी करिता विचारणा केली असता माल खाली केला तिथे ऐरीकेशन वाल्याना रॉयल्टी दिल्याचे सांगितले. 

       तरी पण काही न ऐकता रॉयल्टी दे नाही तर गाडी पोलीस स्टेशनला लावतो.मी तहसिलचा अधिकारी आहे.गाडी लावायची नसेल तर वीस हजार रूपये दे असे म्हटल्याने त्याचे जवळ असलेले गिट्टीचे १३००० रू. चे (५०० च्या २६ नोटा) बडल काढले असता स्वतःला अधिका री म्हणणा-याने ती रक्कम जबरीने हिसकली.

     माझे कडे डिजल करिता पैसे नसल्याने थोडेफार पैसे परत करा म्हटल्याने त्यांनी २००० रू (५०० च्या ४ नोटा) परत केले. आकाश कांबळे थोडा समोर आल्यावर त्यांचेवर संशय आल्याने लगेच पोलीस स्टेशन कन्हानला फोन केल्याने पोलीस स्टेशन वरून पोलीस स्टॉफ येऊन त्यांनी त्या दोन इसमाना पकडुन विचार पुस केली असता कार मध्ये बसलेला इसम दिनेश अरुण माने वय ४३ वर्ष रा. बाबदेव वार्ड क्र.३ मौदा जि. नागपुर व बाहेर येवुन टिप्पर थाबविणारा इसम किशोर मुकेश मानवटकर वय ३७ वर्ष रा. चिरव्हा,ता.मौदा जि. नागपुर असे सांगितल्याने त्याना पोस्टे कन्हानला आणले.

        फिर्यादीच्या तक्रारीनुसार कन्हान पोलीसानी थानेदार उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात पोस्टे कन्हान येथे दोन्ही आरोपी विरूध्द कलम ३९२, १७०, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.तक्रार दाखल झाल्यानंतर कन्हान पोलीस स्टेशनचे उपपोलिस निरिक्षक श्री.चव्हाण पुढील तपास करित आहे.