चंदना प्रमाणे आयुष्य झिजविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना ओळखले पाहिजे.. — या देशातील तमाम महिलांच्या उध्दारासाठी क्रांतीज्योतीने केले कार्य..

    रोहन आदेवार

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

    यवतमाळ/वर्धा 

वर्धा- मुलींच्या शिक्षणासाठी आपले अखंड आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवनाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती कुंभलकर कॉलेज ऑफ सोशियल वर्क वर्धा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. 

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य चंदू पोपटकर सर उपस्थित होते. तसेच मंचावर सांस्कृतिक समिती सदस्य प्राध्यापिका विशाखा मानकर,प्राध्यापक किशोर ढोबळे सर उपस्थित होते.

       कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सावित्रीबाई या एक भारतीय समाजसुधारक,शिक्षणतज्ज्ञ होत्या असे म्हटले. 

      आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्री वादाची जननी मानले जाते सावित्रीबाई भारताची पहिली महिला शिक्षिका, समाजसुधारक होत्या.

         विधवांचे पुनर्विवाह,अस्पृश्यता निर्मूलन,महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारख्या महत्वाच्या कार्याची जाणीव आपल्या मार्गदर्शनातून विध्यार्थ्यांना करून दिली.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विलास बैले सर तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका कमल पोटदुखे यांनी केले. 

        या वेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.