ब्रम्हपुरीत महीला काँग्रेसच्या वतीने ‘सत्याग्रह मार्च’ आंदोलन…

 

दिक्षा ललीता देवानंद कऱ्हाडे 

       वृत्त संपादीका 

            केंद्रातील भाजपा सरकारने महीलांसाठी ३३ टक्के आरक्षण विधेयक मंजूर केले. पण ते लागु होईल याची शाश्वती नाही. 

        तसेच अन्यायाविरुद्ध महीला कुस्ती खेळाडुंनी अनेक दिवस आंदोलन केले पण त्याची दखल सरकारने घेतली नाही.मणिपूर मध्ये महीलांवर अत्याचार सुरू होते तेव्हा देखील केंद्र शासन शांत होते.

           केंद्र सरकारच्या या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य साधून अखिल भारतीय महीला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसुजा, महीला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या सुचनेनुसार ब्रम्हपुरी येथे महीला काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह मार्च काढण्यात आला.

          महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले व महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले यांच्या नेतृत्वाखाली सदर सत्याग्रह मार्च शहरातील काॅंग्रेस कमेटीच्या कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शांततेत कोणत्याही घोषणा न देता काढण्यात आला.

         यावेळी माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी,नगरपरिषदेच्या महीला व बालकल्याण सभापती सुनिताताई तिडके,नगरसेविका लताताई ठाकुर,माजी नगरसेविका जयाताघ कन्नाके, रेश्माताई लाखानी,रश्मीताई पगाडे,कल्पनाताई तुपट, गीताताई मेश्राम,गीताताई कुंडले,रसिकाताई भजनकर,सुशीलाताई सोंडवले,वैष्णवीताई आमले,अंजलीताई कार,मनिषाताई नन्नावरे ह्यांसह अन्य महीला पदाधिकारी उपस्थित होत्या.

        सोबतच माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर,काॅंग्रेसच्या किसान सेलचे तालुकाध्यक्ष वामन मिसार,सोमेश्वर उपासे यांची उपस्थिती होती.