महशुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील ८ आक्टोंबरला चिमूर तालुका दौरावर… — पिकांची पाहणी करण्याकरिता दौरा..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

        वृत्त संपादीका 

     अरमान बारसागडे 

  तालुका प्रतिनिधी चिमूर..

              चिमूर तालुका अंतर्गत सोयाबीन,कपास व धान पिकांवर अनेक रोगांचा पादुर्भाव झाल्याने हाती आलेली पिके नष्ट झाली व होत आहेत.

             सर्व पिकांच्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यासाठी महशुल मंत्र्यांचा ८ आक्टोंबरचा चिमूर तालुका दौरा असल्याचे दिसून येत आहे.

           ८ आक्टोंबरला सकाळी ९ वाजता शासकीय विश्राम चिमूर येथे महशुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आगमन होणार आहे.

          त्यानंतर ते साठगाव व कोलारी परिसरातील शेतमालाची पाहणी करणार आहेत.यानंतर ते भिसी परिसरातील शेतमालाची पाहणी करुन विठ्ठल रखुमाई जिनींग अँन्ड प्रेसींग येथे सकाळी १० वाजताच्या दरम्यान शेतकऱ्यांसी संवाद साधणार आहेत.

        शेतकऱ्यांसी संवाद झाल्यावर सकाळी साडेदहा वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयात चिमूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीचा आढावा घेणार आहेत.तद्वतच पिक नुकसानीच्या अनुषंगाने ई-पिक पहाणी,विक विमा आढावा,वहिवाट रस्ते,सातबारा संगणीकरण,लंम्पी आजार इत्यादी बाबत चंद्रपूर जिल्हा स्तारवरील माहिती घेणार आहेत.  

         दुपारी साडेबारा वाजता नंतर आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेट.

             १ वाजताच्या सुमारास ते चिमूर तालुक्यातील मौजा वाहनगाव (बोथली) येथील पिकांची पाहणी करणार आहेत.

          मौजा वाहनगाव दौरा आटोपल्यावर ते नागपूर कडे प्रस्थान करणार आहेत.महशुल मंत्र्याचा चिमूर दौरा शासकीय वाहणाने(मोटार)होणार आहे.