आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत धनादेश सुपूर्द…

ऋषी सहारे

संपादक

           वडसा तालुक्यातील मौजा नयनपुर वार्ड येथील श्रीमती नवनिता नवलाजी शेंडे, वय ४७ यांचा दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी सर्पदंश मुळे मृत्यू झालेला होता. त्यांची शेतजमीन मौजा नयनपुर या क्षेत्रात असून नेहमीप्रमाणे त्या शेतावर गेले असता त्यांना सर्पदंश होऊन त्यांचा अपघाती मृत्यू झाला. संबंधित घटनेची माहिती कृषी विभागास प्राप्त झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत संबंधित प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला व त्यानुसार सानुगृह निधी रक्कम रुपये दोन लाख रुपये मंजूर झाले. सदर प्रस्ताव तयार करण्याकरता कृषी पर्यवेक्षक भूषण देशमुख व कु. ठाकरे कृषी सहायक यांनी प्रस्ताव तयार केला. कार्यालयामार्फत प्रस्तावाची तालुकास्तरीय समिती समोर पी.डी. खंडाळे, तालुका कृषी अधिकारी व खोब्रागडे, प्रभारी कृषी अधिकारी, वडसा यांच्यामार्फत प्रस्ताव सादरीकरण, मांडणी आदी प्रक्रिया करण्यात आली.

          दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते मृतकाचे पती नवलाजी शेंडे , वारसदार म्हणून यांना सानुग्रह निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

           याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी पी डी खंडाळे, कृषी पर्यवेक्षक खोब्रागडे, भूषण देशमुख, प्रशांत मते व आत्माचे बीटीएम व्ही डी. रहांगडाले उपस्थित होते.

          मृतकाचे पती हे फर्निचरचा व्यवसाय करत असून त्यांची परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे, अशा परिस्थितीत त्यांना कृषी विभागाच्या शेतकरी अपघात योजना अंतर्गत मिळालेली रक्कम त्यांच्यासाठी आजच्या घडीला खूप महत्त्वाची ठरली.

नवलाजी शेंडे यांनी आमदार तसेच कृषी विभागाचे आभार मानले.