फ्रिडमच्या युवकांनी केला श्वानवर अंतिम संस्कार…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली :साकोली येथे गणेश वार्डात नागरिकांनी मुक्या प्राण्यांबदल आपले प्रेम दाखविले. गणेश वार्ड येथे लहान एक श्वानाचे पिल्लू आले होते. तेथील नागरिकांनी त्याला लहान्याचे मोठे केले. त्याला आपल्या घरच्या सदस्य सारखे वागणूक दिली. त्यामुळे साकोलीमध्ये होणाऱ्या चोऱ्या पासून तो नागरिकांच्या घराची रक्षा करत होता. त्यामुळे गणेश वार्ड येथे नागरिक आपल्या घरी सुखाची झोप घेत होते. काही दिवसांपूर्वी बाहेरील आलेल्या गाडीने त्याचा अपघात झाला. त्याला नागरिकांनी पशु वैद्यकीयांकडे नेऊन उपचार केले पण त्याचे प्राण वाचू शकले नाही.

        त्याने इतकी वर्ष नागरिकांची सेवा केली. त्याबद्दल नागरिकांमध्ये दुःखाचे सावट पसरले. यातच येथील रहाणारे फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे यांनी वार्डवासीयांच्या मदतीने त्याचे अंतिम संस्कार करण्याचे ठरविले आणि ते पार ही पाडले. या माणूसकीच्या परीचयात किशोर बावणे, जि.प. प्राथ. शाळा. व्य.स.अध्यक्ष प्रकाश कोवे, संजय बावणे, विजय बावणे, निखिल तनवानी, पवन वलथरे, आर्यन कोवे, मयूर सोनवणे, धवल टेंभुर्णे, रितिक जुनघरे, भिवा गहाणे हे या मूक प्राणीप्रेम सेवाकार्यात हजर होते.