अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी :- आरमोरी तालुक्यातील पंचायत समिती आरमोरी केंद्र- सिर्सी अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विहीरगाव शाळेतील इयत्ता ५ वी मधील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयुष प्रकाश सहारे, कलश पंकज दुबे, सानिया सैजाद बेग,अथर्व ओमकेश भोयर हे चार विद्यार्थी सन २०२४-२५ या सत्रात घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यामधे चार पैकी चारही विद्यार्थी पात्र झाले. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100% निकाल लागला.
त्यांच्या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री.विनोद खोब्रागडे, वर्गशिक्षक श्री.राधेश्याम देशकर, श्री.अभय खोब्रागडे, कंत्राटी शिक्षक श्री.अश्विन बोदेले, प्रशिक्षणार्थ शिक्षक श्री.शक्ती कोसरे, यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.पात्र ठरलेल्या चारही विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.
सर्व शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती करत राहावी. अशा शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, तसेच आपल्या आई-वडिलांना दिले.


